दंगलकार चंदनशिवे यांच्या लक्षनिय उपस्थितीत व्याख्यान संपन्न
अनिल वीर सातारा : सत्यशोधक डॉ . अण्णाभाऊ साठे पहिले ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मिरजगांव (अहिल्यानगर) या ठिकाणी अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य प्रशांत पोतदार (सातारा) यांनी ” मनोरंजनातून विज्ञान ” या विषयावरती व्याख्यान दिले.
यावेळी महाराष्ट्रातील नावाजलेले जेष्ठ कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते वात नसलेला पाण्याने दिवा पेटवून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. चमत्काराने मागील रहस्य उघडून त्यामागील विज्ञान व हातचलाखी पोतदार यांनी समजून सांगितली. जादूटोणाविरोधी कायदा याचे महत्त्व आणि अंमलबजावणी करण्यासाठी व विवेकी समाज निर्मितीसाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीमध्ये आपापल्या शक्यतेनुसार सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.