सातारा : पत्रकार दिनाचे औचित्य साधून आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्यास अनिल वीर यांना निमंत्रित करण्यात आले असून आपला सन्मान स्विकारावा.अशी माहिती रमेश संकपाळ (अध्यक्ष,सुयश सामाजिक व शैक्षणिक संस्था नवी मुंबई) व भिमराव धुळप (संपादक – धगधगती मुंबर्ई वृत्तपत्र – DDM न्यूज चॅनेल) यांनी दिली आहे.
बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर विविध क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांना विविध स्तरावरील जिल्हा,राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत.पत्रकार म्हणूनही सेवाभाव म्हणून निरंतर काम करीत आहेत.त्यामुळेही त्यांचा ठिकठिकाणी सन्मान होत असतो.
ऐतिहासिक सातारा जिल्ह्यातील रोखठोक पत्रकारांचा सन्मान सोहळा महायोगी गगनगिरी माध्यमिक विद्यालय कापसेवाडी,ता.जावली येथे रविवार दि.५ रोजी सकाळी १०।। वा.मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.यावेळी राष्ट्रीय शिवव्याख्याते प्रा.रवींद्र पाटील यांचे, “अपरिचित शिवराय” या विषयावर व्यख्यान होणार असून प्रमुख अतिथी म्हणून नवीमुंबई येथील माजी अभियंता शामराव शिरतोडे उपस्थीत राहणार आहेत. याशिवाय,संवाद नात्याचा – कवी डॉट कॉम निमित्त विशेष कवी संमेलनही होणार आहे. यावेळी रुद्राक्ष पातारे,प्रसाद माळी, नारायण लांडगे-पाटील,अनुकूल माळी, अनिल सपकाळ व रेश्मा जांभळे कविता सादर करणार आहेत. निर्मिती सूत्रधार प्रा.रवींद्र पाटील असून सूत्रसंचालक म्हणुन शंकर गोपाळे काम पाहणार आहेत.