सिन्नर प्रतिनिधी : श्रीमानयोगी शिवछत्रपती शेतकरी विद्यालय, गूळवंच तालुका -सिन्नर जिल्हा- नाशिक.मधील अध्यापिका श्रीमती वृषाली लक्ष्मण सानप यांना 22 डिसेंबर 2024 रोजी “पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,वृंदावन धाम,उत्तरप्रदेश” यांचे वतीने सेवानिवृत्त न्यायधीश देवेंद्रकुमार जैन मध्यप्रदेश. व पंडित दीनदयाल उपाध्याय, विद्यापीठ कुलगुरु यांचे हस्ते विद्यावाचस्पति (डॉक्टरेट)पदवी बहाल करण्यात आली. नुकतेच मुख्याध्यापक संघाच्या वतीने सिन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव एस .बी.देशमुख सर यांचे हस्ते श्रीमती वृषाली सानप यांचा सन्मान करण्यात आला.
वक्ता,लेखिका,कवयत्री,व्यवस्थापक,सूत्रसंचालक अश्या बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या श्रीमती सानप मैडम या 30 वर्षापासून हिंदी विषयावरील असलेल्या प्रगाढ़ प्रेमामुळेच सातत्याने हिन्दीत लेखन करीत आहेत. त्यांनी “शबरी खंड्य कांव्यका का अनुशिलन.” या विषयावर एम.फिल. केलेले असून हिंदी प्रचार व प्रसारचे मोठे काम त्यानी आजवर केलेले आहे.
हिंदी भाषेत त्यांची आजवर 4 काव्यसंग्रह प्रकाशित आहेत..त्यानी “क्या है आध्यात्म ?” या विषयावर अत्यंत सखोल चिंतन व अभ्यासाच्या आधारे 95 लेख इंटरनेट च्या माध्यमातून समाजासमोर मांडले आहेत,ज्यात त्याच्या आध्यात्मिक साधनेची योग दृष्टि झलकते. शाळेतील सन्मानसोहळ्याचे सूत्रसंचलन श्रीमती सुरेखा जगताप यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्याध्यापक मधुकर काळे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,गुळवंच ग्रामपंचायत सदस्य संतोष सानप, संस्था कुटुंबातील सदस्य प्रकाश सानप हे उपस्थित होते.