निबंध स्पर्धेत दृष्टी मोरेचा जिल्ह्यात प्रथम क्रमांक
गोंदवले – ऐतिहासिक छत्रपती शाहू नगरीत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पवित्र पावन झालेल्या तसेच ज्ञानसूर्य भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाचा जिथे श्रीगणेश झाला होता अशी ती पवित्र ऐतिहासिक साताराच्या राजवाड्यातील प्रतापसिंह हायस्कूलची वास्तू या ठिकाणी सन २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षाकरिता स्वर्गीय यशवंतराव चव्हाण जिल्हा स्तरीय निबंध बाल व्यक्तिमत्त्व स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.यामध्ये मोठया गटातील निबंध स्पर्धेत सातारा जिल्हा माण तालुक्यातील आदर्श लोधवडे गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची कुमारी दृष्टी सुनिल मोरे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकवून माणदेशात एक उच्चांकी असा शैक्षणिक इतिहास निर्माण केला.तिचे प्रतापसिंह हायस्कूल मध्ये पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते जल्लोषी अभिनंदन करण्यात आले.
अभिनंदन करणाऱ्यामध्ये प्रामुख्याने सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मा.शबनम मुजावर मॅडम,माणचे गटविकासाधिकारी मा. प्रदीप शेंडगे,सहाय्यक गटविकासाधिकारी मा.चंद्रकांत खाडे, गटशिक्षणाधिकारी मा.लक्ष्मण पिसे,जिल्हा परिषदेच्या शिक्षण विस्तारधिकारी मा.मुळे मॅडम,शिक्षण विस्ताराधिकारी मा.रमेश गंबरे केंद्रप्रमुख शोभा पवार आदि मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले,तर तिच्या राजवाड्यातील मुख्य सत्कार समयी जिल्हा विस्ताराधिकारी मा.सस्ते, मा.कोर्डे ,निबंध परीक्षक शिक्षक आणि मॅडम,दृष्टी मोरेची निबंध स्पर्धेतील विशेष अशी खास तयार करून घेणारे तिचे मार्गदर्शक प्राथ.शिक्षक सतेशकुमार मारुती माळवे,संपूर्ण जिल्हाभरातून स्पर्धेसाठी आलेले स्पर्धक विद्यार्थी व त्या विद्यार्थ्यांनाचे आलेले मार्गदर्शक शिक्षक व काही पालक वर्ग यांच्या उपस्थितीत तिच्या अभिनंदनचा हा सत्कार सोहळा प्रतापसिंह हायस्कूल मध्ये नुकताच पार पडला.
याशिवाय तिचे अन्य अभिनंदन करणाऱ्या मान्यवरात लोधवडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कुंडलिक चोपडे,उपाध्यक्ष सर्जेराव कांबळे व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य,लोधवडे शाळेचे मुख्याध्यापक महादेव ननावरे ,सहकारी शिक्षक दिपक कदम,सुचिता माळवे,संध्या पोळ, दिपाली गोरे-फरांदे ,मनीषा घरडे,अश्विनी मगर व तिचे पालक आणि सध्याला लोधवडे ग्रामस्थांनाच्या मधून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हा सुरूच आहे.