अनिल वीर, सातारा : नात्या-गोत्यात अथवा कुटुंबातील बंधुत्वाच्या नात्यापेक्षा रक्ताव्यतिरिक्त सामाजिक सलोख्याने जे नाते निर्माण होते.त्यास खऱ्या अर्थाने बंधुत्व म्हणतात.असे प्रतिपादन मुख्य मार्गदर्शक लता भिसे (पुणे) यांनी केले. आम्ही भारताचे लोक अभियानांतर्गत सामाजिक सलोखा कार्यक्रम येथील गुरुवार पेठेतील सभागृहात संपन्न झाला. तेव्हा लता भिसे मार्गदर्शन करीत होत्या.यावेळी मंचावर अंनिसचे प्रकाश खटावकर व अनिल वीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.जसे पाणी कमीजास्त वेगवेगळ्या ठिकाणी मिळत आहे. त्या पद्धतीने भेदभावही कमी झालेला नाही. तेव्हा सर्व समाजबांधवांनी एकत्रीत आले पाहिजे. तरच बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे सामाजिक सलोखाबरोबरच सर्वांगीण विकास होण्यास साह्य होईल.तेव्हा शत्रुत्वापेक्षा बंधुत्वाच्या नात्याने व्यवहार केला पाहिजे.” याशिवाय,त्यांनी मानवी शरीराचे उदाहरण देऊन एकसंघपणाचा पुरस्कार केला.
आपल्या भारतीय राज्यघटनेला ७५ वर्ष पूर्ण झाले आहेत.आम्ही भारताचे लोक अभियांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.भारतीय राज्यघटना निर्मिती मागची भूमिका आपल्या देशात समता, बंधुता, एकता, एकात्मता, नांदावी व ती लोकांमध्ये रुजावी.तसेच सर्वांनी आनंदाने सुखाने रहावे.पण, प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. तर देशातील समाजिक विषमता वाढताना व माणसा माणसांच्या मनात एकमेकांबद्दल द्वेष पसरताना दिसत आहे. ही विषमता दूर करण्यासाठी, आम्ही ? या संविधान संवर्धन अभियान अंतर्गत सामाजिक सलोखा कार्यक्रमात पथनाट्य,चर्चासत्र व मान्यवरांची मनोगत संपन्न झाली.सदरच्या कार्यक्रमास महेश चव्हाण,उदय बाबर, सविधानप्रेमी महिला, विविधी क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.गणेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले.