अनिल वीर सातारा :– कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणीची सहविचार सभा रत्नागिरी येथे शनिवार दि.१ आणि रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी ओंकार मंगल कार्यालय, गांजुर्डा, शिरगाव रत्नागिरी येथे दोन दिवस संपन्न होणार आहे.अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारणी सदस्य मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर, राधा वणजू , राहुल थोरात व अण्णा कडलास्कर यांनी दिली.
सदरच्या सभेत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मागील सहा महिन्यांच्या विभागवार कामाचा आढावा घेऊन पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन करण्यात येईल. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र विभाग, अंनिस प्रकाशन विभाग, प्रशिक्षण विभाग, सोशल मीडिया विभाग, महिला विभाग, आंतरजातीय विवाह सहाय्य विभाग, मानसिक आरोग्य विभाग, बुवाबाजी संघर्ष विभाग या व इतर विभागांच्या कामकाजावर चर्चा होईल.