अनिल वीर सातारा : शिवजयंती निमित्त ७२ वर्षीय आजीचे केले जट निर्मूलन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे करण्यात आले. शिंगणवाडी (चाफळ), ता. पाटण या डोंगरांचे कुशीत वसलेल्या गावातील विजय आनंदराव पवार यांची मातोश्री सोनाबाई आनंदराव पवार (वय – ७२ वर्षे) यांची गेली ३५ वर्षांपासूनची जट होती.त्यांना तेव्हापासूनच पाठदुखी , मान अवघडणे ,डोळ्यांची जळजळ असा त्रास होत असे.त्या परीसरातील कार्यकर्ते डॉ.अनिल घाडगे यांनी वारंवार अत्यंत संयमी, विवेकी पद्धतीने त्यांना समजावून सातारा येथील अंनिसच्या जिल्हा कार्याध्यक्षा सौ. वंदना माने यांचेशी संपर्क फोन वरून साधून माहिती दिली.
पवार कुटुंबियांशी बोलून समुपदेशन करुन जट कशी तयार होते ? मनाची स्थिती कशी बदलते ? यातून उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या व त्याची सोडवणूकबाबत तातडीने वेळ निश्चित करून जट काढण्याचे ठरविले. त्यामुळे त्यांच्याच राहत्या घरी जाऊन जट काढण्यात आली.तेव्हा अं.नि.स.कार्यकर्ते डॉ.दिपक माने तसेच आजी यांचे नातू , सून ,मुलगा उपस्थित होते.