मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्यतर्फे पुरस्कार वितरण
सातारा : ज्ञानसूर्य फाउंडेशन व मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय संविधान संमेलन संपन्न झाले.तेव्हा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण भाग्यश्री मंगल कार्यालय, ढेबेवाडी (ता.पाटण) येथे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीतीत करण्यात आले. बंधुत्व पुरस्कार विजेते डॉ.श्रीमंत कोकाटे (सुप्रसिद्ध वक्ते व इतिहास अभ्यासक),ऍड.सुरेश माने (राज्यघटना तज्ञ) व कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोदभाऊ निकाळजे उपस्थीत होते. ऍड.सुरेश माने म्हणाले, “देश-विदेशात संविधानावर चर्चा चालू आहे.संविधान संस्कृती अद्याप रुजलेली नाही.राज्यकर्ते संविधान व बाबासाहेब यांचा वापर निवडणुकीपूरते करतात.”असा हल्लाबोल करीत ऍड.माने यांनी विविध उदाहरणाद्वारे विस्तृत माहिती कथन केली. सुरांगणाचा कार्यक्रम प्रारंभी व समारोपप्रसंगी सौ.प्रणिता मोहिते-कदम आणि सहकारी यांनी मोठ्या उत्साहात संपन्न केला. “छत्रपती शिवराय व संविधान जाणून घेणे.” यावरही मार्गदर्शन प्रमुख वक्त्यांनी केले.याशिवाय,संबोधी तोरणे या चिमुकलीने मनोगत व्यक्त करून संविधानाचा जागर केला.
यावेळी सामाजिक,वैद्यकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्यात सहभागी असणारे बाळासाहेब सातपुते, आनंदा कांबळे, विजय कांबळे व काशिनाथ कचरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. दिगंबर पेंढारकर, सुनील पन्हाळे, नितीन देसाई, मिलिंद कांबळे, तुळशीराम सुतार व अनिल वीर यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. शिवाय, राहुल रोकडे, इरफान सय्यद, दीपक माने व सा. सामाजिक संस्था परिवर्तन सामाजिक संस्था यांनाही समाजभूषण पुरस्कार वितरीत करण्यात आले.प्रथमतः महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.तद्नंतर सामुदायिक संविधान प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले.कवी परशुराम सुतार यांनी प्रास्ताविक केले. प्रा.दीपक तडाखे यांनी तडाखेबाज सूत्रसंचालन केले. याकामी, ज्ञानसूर्य फाउंडेशन व मैत्री ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवी कांबळे, किरण गायकवाड, संतोष यादव व सुरेश कांबळे यांनी अथक असे परिश्रम घेतले.
यावेळी प्राणलाल माने,दिलीप जैन,बाळासो देवकांत,दीपक भोळे,आंनदा कांबळे, दीपक कम्बले,उमेश काकडे,विजय भंडारे,सुनील निकाळजे,विजय कांबळे, बाळासाहेब सातपुते, संदीप पवार, ऍड. विलास वहागावकर, राजेंद्र सावंत, प्रा.रवींद्र सोनावले, अर्जुन कांबळे, मनोज भंडारे, संतोष यादव,सुरेश कांबळे, जयवंत लोखंडे,बी.एल. सावंत, अर्जुन कांबळे, आबासाहेब सोनलंडे, सुदाम रोकडे,चंद्रकांत खंडाईत, बाळासाहेब जगताप, आप्पासाहेब मगरे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.