पैठण(प्रतिनिधी):पैठण पंचायत समिती मध्ये प्रधानमंत्री आवास योजना टप्पा क्रमांक दोन अंतर्गत तालुक्यातील ६ हजार ६७७ लाभार्थ्यांना प्रत्येकी १५००० हजार रूपये प्रमाणे पहिला हप्त्याचे वनक्लिकचे वितरण आॅनलाईन टाकण्यात आल्याने तालुक्यातील गोरगरीबांना आनंदी वातावरण निर्माण झाले आहे. पहिला हप्त्याचे वनक्लिकचे वितरण शनिवार (ता.२२) रोजी दुपारी ३ वाजता पैठण पंचायत समिती कार्यालयात सदरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी पैठण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजू नाना भुमरे पाटील व पाचोड ग्रामपंचायतीचे युवा सरपंच शिवराज भैय्या भुमरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तालुकास्तरीय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मंजूर लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीबाबत आदेश आणि प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले आहे. तसेच सदरील कार्यक्रमास स्थळे तालुक्यातील ११० ग्रामपंचायत मधून प्रत्येकी मंजूर झालेले पाच लाभार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. उपस्थित लाभार्थी यांना पंचायत समितीच्या वतीने सत्कार करून त्यांना अनुदान वितरण आणि मंजुरी आदेश व प्रमाणपत्र तसेच ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन बाबत लाईव्ह स्क्रीनवर राज्यस्तरीय सोहळा चे प्रक्षेपण दाखविण्यात आले तसेच घरकुल योजनेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली यावेळी तालुक्यातून सदरील कार्यक्रम स्थळी आजी-माजी पदाधिकारी इतर सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे व पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांच्या प्रयत्नातून पैठण तालुक्यात ९४०० घरकुल मंजूर झाले असून ६६७७ लाभार्थ्यांना आज वनक्लिकने घराचा हप्ता मिळाला आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन पैठण पंचायत समितीच्या प्रांगणात करण्यात आले होते यावेळी पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान घरकुल आवास योजना टप्पा क्रमांक दोन बाबतच्या व्हिडिओ काॅन्फरन्स व्दारे प्रक्षेपन(लाईव्ह ) पंचायत समिती पैठण येथे दाखविण्यात आले. यावेळी पैठण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मनोरमा गायकवाड, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे,पैठण पंचायत समिती घरकुल विभागाचे अभियंता अजय राऊत, अमोल शेळके,कुंदन भालेराव,धिरज कांबळे,राज भालेराव, संगणक आॅपरेटर दिनेश सवने, सरपंच किशोर चौधरी, धनंजय मोरे,विजय सुते,मनिष औटे, संजय पवार, गंगाधर निसरगंध, निखिल खिस्ती, अरूण डोंगरे स पैठण तालुक्यातील घरकुल लाभार्थी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.