पैठण(प्रतिनिधी):प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 – 25 मुंजूर लाभार्थ्यांना आज राज्य शासनाने आयोजित केलेल्या कार्यक्रमा अंतर्गत ग्रामपंचायत नायगाव येथे सरपंच सौ.निर्मला कोडीराम दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमात आलेल्या सर्व घरकुल लाभार्थ्यांचे स्वागत करून प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.व या प्रसंगी उपस्थित सर्वांना ग्रामसेवक श्रीमती इंगळे मॅडम यांनी घरकुल संदर्भांत मार्गदर्शन केले.यावेळी मा. सरपंच किशोर काळे,मा.सरपंच गोरख घटे , उपसरपंच आप्पासाहेब गिरगे , किशोर दसपुते, सचिन दिवेकर,यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य तथा प्रतिष्ठित नागरिक व घरकुल लाभार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.यावेळी उपस्थित लाभार्थ्यांनी खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास बापू भुमरे यांचे आभार मानले.