आज राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार विजेते हैटट्रिक साधणार !

0

सातारा : बहुआयामी व अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेले समाज मनातील आपलेपण जपणारा बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना आतापर्यंत ५५ पुरस्कार मिळाले असले तरी समाजभूषण यापूर्वी २ वेळा मिळाला होता.रविवार दि.१६ रोजी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मिळत असल्याने आपसूकच हॅटट्रिक साधली जाणार आहे. येथील नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये महालक्ष्मी आधार फाऊंडेशनतर्फत राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार मान्यवरांच्या प्रमुख उपस्थीत वितरण सोहळा संपन्न होणार आहे.त्यात अनिल वीर यांचाही समावेश आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विचारांची मांडणी करीत आहे.

         

बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे १९९१ पासून दरवर्षी बंधुत्व पुरस्कार देत आले आहेत.शिवाय, प्रतिष्ठानतर्फेही गुणिजनांचा पुरस्कार देऊन गौरव करीत असतात.पुरस्कार देणे-घेणे तेपण शिफारशीविना नित्याचेच झाले आहे.म्हणूनच पुरस्कारांचा बादशहा म्हणुन वीर सरांचे आगळे-वेगळे असे समाजात आदराचे स्थान आहे.ते सर्वच क्षेत्रात कार्यरत असल्याने आपसूकच त्यांचा सर्वघटकांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे चांगले आहे. ते ते वीरसर स्वीकारतात. स्वत:ची हानी झाली तरी सामाजिक व राष्ट्रीय हिताचेच निर्णय घेत असतात. सर्वधर्मसमभाव या न्यायाने समाजात वावरत असतात. वास्तव परिस्थितीवर नेहमी चिंतन-मनन करतात.

चांगल्या कामासाठी कोण्हीही स्वतःचा अथवा पक्षाचा अजेंडा वापरु नये.आपल्यामुळे कोणाचेही नुकसान होता कामा नये.न्यायासाठी आंदोलन-निदर्शने ठीकच.मात्र, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान होणार नाही.याची काळजी घेतली पाहिजे.तेव्हा राष्ट्रास भूषणावह कार्य करीत राहणे तीच खऱ्या अर्थाने समाजसेवा असू शकते.सध्या बीड प्रकारणासारखाच सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात प्रकार असेल का ? सरपंच हत्या प्रकरणातील निलंबित पोलीस आणि न्यायाधीशांची एकत्रीत धुळवड ! काय म्हणावे या कृतीला ? काहींच्यामध्ये कथनी व करनीमध्ये फरक का ? असे अनेक नानातऱ्हेचे प्रश्न पडत असतात.अशा गोष्टींचा विचार करायचा नाही.असे म्हटले तरी मन काही स्वस्थ बसू देत नाही.शब्द नि:शब्द.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here