अनिल वीर सातारा : अश्विनीताई धोंगडे यांनी नोबेल प्राईज मिळालेल्या साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यावर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले आहे. येथील दिपलक्ष्मी सांस्कृतिक भवनमध्ये आम्ही पुस्तक प्रेमी समूह व दिपलक्ष्मी यांच्या संयुक्त विद्यमाने नोबेल साहित्य दर्शन व थोडे जनातले थोडे मनातले या या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन डॉ.देवानंद सोनटक्के,आश्लेषा महाजन,प्रकाशक मधुर बर्वे ऍड.सिमनतीनी नुलकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षहस्थानी विनोद कुलकर्णी होते.
यावेळी आश्लेषाताई महाजन पुस्तक प्रेमी समूहाचे डॉ.संदीप श्रोत्री,शिरीष चिटणीस आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. लेखक, वाचक आणि रसिक यांच्यासाठी महत्वाचा कार्यक्रम होता.नोबेल मिळालेल्या लेखकांना ते का मिळाले ? लेखक, त्याची शैली, फॉर्म, बॅकग्राऊंड, असं बरंच काही समजून घेता आले. मुख्य म्हणजे हे साहित्य आपल्याकडून फारसं वाचलं जातं नाही. त्याचा परिचय पुस्तकातून होतो. त्यासाठी अश्विनीताई यांनी अफाट कष्ट घेतले आहेत. मराठी भाषा संवर्धनात प्रत्येकाने वाटा उचलायला हवा.असे कार्यक्रम कधी नाही ते मात्र साताऱ्यात झालेले आहेत.यावेळी श्रोतावर्ग मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.नानल यांनी आभार मानले.