सिन्नर प्रतिनिधी : कडक उन्हाची चाहूल लागली,झाडाची पानगळती झाली थंड निवारा नाहीशा झाला आणि शाळेतल्या पक्षाचा चिव चिवाट अचानक कमी झाला हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येताच विद्यार्थ्यांनी टाकाऊ पुठ्ठे,कागद,सुगरणीचे गवताचे खोपे तयार केले त्यात पाणी व पक्ष्यांसाठी धान्य टाकले आणि पुन्हा चिवचिवाट सुरु झाला. पाडळी पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांनी चिमणी वाचविण्यासाठी पक्ष्यांची निर्माण झालेली निसर्गातील प्रतिकुल परिस्थिती लक्षात घेता व चिमण्यांची कमी झालेली संख्या विद्यार्थ्याच्या लक्षात आली. त्याचे अनेक कारणे विद्यार्थ्यांनी शोधून काढले. त्यामध्ये वृक्षतोड,औद्योगीकरण,रस्त्याची बांधकामे ,सिमेंटच्या घरामुळे चिमण्यांना घरटे करायला जागा उरलेली नाही उन्हाळ्यात दाना, पाण्यासाठी पक्षाची आर्त हाक ऐकायला मिळते. यामुळे घराबाहेर धान्य,जल,निवारा कृत्रिम घरटे व वृक्षारोपण करून चिमण्या प्रति सामाजिक बांधिलकी ठेवणे.हे सर्वांचे कर्तव्य आहे असा संदेश जागतिक चिमणी दिनानिमित्त पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिला . शाळेतील झाडांना कृत्रिम घरटे चिमण्यांसाठी बांधले,त्यामध्ये चिमण्यांसाठी पाण्याची व दाण्याची व्यवस्था करण्यात आली.त्यामुळे पुन्हा चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळाला.
विद्यार्थ्यांनी स्वत:चिमण्यांसाठी पुठ्यांची घरटे बनविले व शाळेतील झाडांवर व आपल्या घराच्या आसपास असणाऱ्या झाडांवर टांगले.यामुळे चिमण्यांची संख्या निश्चितच वाढण्यास मदत होईल. बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी विद्यार्थ्यांना निसर्गातील प्रत्येक घटक पशुपक्षी झाडे,फुले,फळे, नद्या, नाले, डोंगर हे अतिशय महत्वाचे घटक असून निसर्ग वाचविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. आपण निसर्गातील वृक्षतोड थांबवून पशु -पक्ष्यांचे रक्षण केले पाहिजे.
गेल्या पंधरा वर्षापासून विद्यालयात विदयार्थी मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पक्ष्यांसाठी दाना पाणी व निवारा यांची टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ घरटे बनवून झाडांना बांधतात आणि वर्षभर हे चिमणी कावळे व इतर पक्ष्यांच्या सानिध्यात राहतात.सुगरणीचे घरटे व पुठ्यांची घरटे बनविण्याचे प्रशिक्षण विद्यालयातील कला शिक्षक के.डी.गांगुर्डे यांच्याकडून दिले जाते. विद्यार्थ्यांनी १५० घरटे बनवून ती झाडाला टांगली.
बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयातील उपशिक्षक टी.के.रेवगडे,बी.आर. चव्हाण,आर.व्ही.निकम,एस.एम.कोटकर,आर.टी.गिरी, एम.एम.शेख, सविता देशमुख,टी.के.रेवगडे, सी.बी.शिंदे, के.डी.गांगुर्डे, एस. डी.पाटोळे, आर.एस.ढोली,ए.बी.थोरे हे उपस्थित होते.