राजे रामराव महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागाचा उपक्रम
जत (प्रतिनिधी) : राजे रामराव महाविद्यालय,जत येथे रसायनशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सेंद्रिय रेणूंचे वर्णक्रमीय विश्लेषण व खेळांद्वारे रसायनशास्त्र शिकणे या विषयावर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती म्हणून शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथिल रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ.गजानन राशिनकर व प्रोफेसर डॉ.दत्तात्रय पोरे हे तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर या कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ.अरविंद पवार यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रारंभी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा.कृष्णा रानगर यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यशाळेचा उद्देश सांगितला.
पहिल्या सत्रामध्ये प्रो.डॉ. राशिनकर यांनी “खेळाद्वारे रसायनशास्त्र शिकणे” या नवीन शिक्षण पद्धतीने विध्यार्थ्याचे गट तयार करून खेळाद्वारे रसायनशास्त्र कसे शिकता येते हे प्रात्यक्षिकाव्दारे पटवून देऊन विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण करुन“खेळाद्वारे रसायनशास्त्र शिकणे” या नवीन शिक्षण पद्धतीचे महत्व सांगीतले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रो.डॉ.डी.ऐम.पोरे बी.एसी.भाग ३ व एम्.एसी.च्या विध्यार्थ्याना स्पेक्ट्रोस्कोपी बद्दल माहिती सांगितली. प्रारंभी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाळ यांनी पाहुण्याची ओळख करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु.मेहेजबिन मुजावर यांनी तर आभार डॉ.गोविंदराव साळुंके यांनी मानले. तर या एक दिवशीय कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ.अरविंद पवार यांनी काम पाहिले. या कार्यशाळेस रसायनशास्त्र विभागमधील सर्व प्राध्यापक व बी. एस्सी.भाग ३ व एम्.एस्सी.चे सर्व विध्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.