नांदेड – प्रतिनिधी
येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्येकर्ते अशी ओळख असलेल्या इंजी स्वप्निल उर्फ बंटी इंगळे पाटील यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्षपदी युवक चे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या पत्राव्दारे निवड करण्यात आली असून त्यांच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्याचे . उपमुख्यमंत्री . अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण तथा नांदेड जिल्हाचे नेते कंधार लोहा मतदार संघाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर , नांदेड दक्षिण मतदार संघाचे माजी आमदार मोहनअण्णा हंबर्ड आदींचे स्वप्निल इंगळे यांनी आभार व्यक्त केले आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांच्या सोबत सदैव एकनिष्ठ ः
स्वप्निल इंगळे पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते असून राष्ट्रवादीचे निष्ठावान अशी त्यांची ओळख संपूर्ण जिल्हा भरात आहे त्यांनी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणुन कार्यरत असताना विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न घेऊन यशस्वी आंदोलन करत ते मार्गी लावले आहेत त्यांच्या राजकीय वाटचालीत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून ओळख निर्माण केली आहे त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कार्यकर्त्यांना विविध व्यवसायामध्ये सक्षमपणे उभे करण्याचे काम केले असून राष्ट्रवादी काँग्रेसचा उच्च शिक्षित विद्यार्थी नेता म्हणून त्यांना पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी पाहत आले आहेत त्यांच्या पक्षनिष्ठेचे फळ हे जिल्हाध्यक्ष पदी निवड करून पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले आहे
जिल्हाभरातील युवकांशी संपर्क वाढविणार
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपण जिल्हाभरातील युवकांची मोठी फळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत उभी करणार तसेच युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम तत्पर राहू तसेच तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येयधोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्नशिली राहू अशी प्रतिक्रिया यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष इंजि. स्वप्निल उर्फ बंटी इंगळे पाटील यांनी दिली…
आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विशेष आभार..!
आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सोबत पुढील राजकीय कारकीर्दीत आपण सोबत काम करणार अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्यांच्या या निवडीबद्दल त्यांनी आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे विशेष आभार व्यक्त केले तसेच त्यांच्यासारख्या नेत्यामुळे मला तब्बल वीस वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केल्यानंतर तळागाळातील सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला न्याय मिळाला असल्यामुळे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थाने कदर असलेले नेतृत्व असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना व्यक्त केली