येवला, प्रतिनिधी :
क्रीडा व सामाजिक क्षेत्रात नवलौकिक असलेले नगरसुल येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक मनोज ठोंबरे यांना नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सोसायटीच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांची सर्वात मोठी आणि संघटन असलेली ही सोसायटी असूनशिक्षकांची एक मोठी अर्थवाहिनी म्हणून कार्यरत आहे. सोसायटीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधून गुणवंत शिक्षकांची निवड केली असून ठोंबरे यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची निवड झाली आहे.

नाशिक येथील रावसाहेब थोरात सभागृह ६ एप्रिल रोजी अध्यक्ष शांताराम देवरे यांच्या अध्यक्षते हा पुरस्कार आयोजित करण्यात आलेला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे,कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार असून सोसायटीचे तालुका संचालक गंगाधर पवार सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहे.
