लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण करू या
सिन्नर प्रतिनिधी : आजच्या युगात आपले छंद जोपासण्यासाठी आवश्यक असलेल्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थी विसरून गेले व मोबाईलच्या जगात वेगवेगळे छंद जोपासू लागले मग ते आपला वेळ व्हिडीओ बघण्यासाठी व शाळांमध्ये सुद्धा आपण व्हिडीओ दाखवायला सुरुवात केली.सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी पुस्तके वाचन विसरू लागला.टीव्ही पाहणे, मोबाईल हाताळणे यामध्ये अधिक व्यस्त झाला.वाचन संस्कृती वाढण्यासाठी नव्या पिढीने म्हणजे आजच्या मुलांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचा.
प्रसिद्ध लेखक, कवी यांचे पुस्तके वाचत चला,वर्तमान पत्रे वाचा हा मुख्य उद्देश बाल पुस्तक दिन साजरा करण्याचा असल्याचे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.बी.देशमुख यांनी मुलांना सांगितला.
या कार्यक्रमासाठी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष व विद्यालयाचे उपशिक्षक टी.के.रेवगडे, बी.आर.चव्हाण, आर.व्ही.निकम, एस.एम.कोटकर, आर.टी.गिरी.एम.एम.शेख, सविता देशमुख,सी.बी.शिंदे,के.डी.गांगुर्डे,एस.डी.पाटोळे,आर.एस.ढोली,ए.बी.थोरे उपस्थित होते.