अन्यथा, विश्वव्यापी आंदोलन छेडले जाईल ! – श्रामणेर संघाचा इशारा

0

सातारा : भारतातील बिहार राज्यातील बुद्धगयामधील महाबोधी बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात द्यावे.तसेच १९४९ चा कायदा तातडीने रद्द करण्यात यावा.या मागणीसाठी चालू आंदोलनास पाठींबा व्यक्त करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा प्रणित श्रामनेर संघाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण – आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संपन्न झाले.तेव्हा ताब्यात द्यावे.अन्यथा,विश्वव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. सरतेशेवटी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले.

       

  प्रथमतः डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास केंद्रीय शिक्षक भागवत भोसले व व मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.भन्ते दिंपकर (थेरो) यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण विधी पार पडला.तद्नंतर जयघोष करीत पोवई मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुद्धपुजा करण्यात आली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर व भ.गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना अनुक्रमे अनिल वीर व ऍड.हौसेराव धुमाळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नंदकुमार काळे यांनी सूत्रसंचालन केले.संपूर्ण नियोजन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव,महासचिव दिलीप भोसले,तालुकाध्यक्ष ऍड. विजयानंद कांबळे व त्यांचे पदाधिकारी यांनी नियोजन केले.त्यामध्ये श्रमनेरतर्फे चंद्रकांत खंडाईत व त्यांचे सहकारी यांनी साह्य केले. यावेळी शिवनाथ जावळे,आप्पा मोरे, किसन खंदारे,संघमित्र मोरे यांच्यासह श्रामणेर संघ मोठ्या संख्येनी उपस्थीत होता.सदरच्या आंदोलनात महाविहार बांधकाम समितीचे अध्यक्ष व्ही.आर. थोरवडे,भारतीय बौद्ध महासभेचे कराड तालुकाध्यक्ष आप्पा अडसूळे व जिल्हा आजी-माजी पदाधिकारी,विद्याधर गायकवाड, समाधान कांबळे,सुमारे ५० श्रामणेर यांनी आंदोलनात सहभाग घेतला.त्यामध्ये सुनील कदम,दादासाहेब कांबळे, किशोर गायकवाड,योगेश कांबळे,अनिल कांबळे, बाळासाहेब जाधव,बाळासाहेब जगताप,शरद कदम, परिहार, सपकाळ बंधू,उपासक व उपासिका, पतसंस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, ज्येष्ट नागरीक संघाचे सचिव बी.एल.माने, त्रिरत्न महासंघाचे धम्मचारी संघादित्य, धम्ममित्र विश्वास सावंत, रिपब्लिकन पक्षाचे गणेश कारंडे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ओव्हाळ,अजित जगताप,संदीप जाधव, कल्पना कांबळे व महिला उपासक उपस्थीत होत्या.

       

 “भारताची मुळ ओळख ही तथागत गौतम बुद्धांच्या मुळेच जगात असल्याचे दिसून येते बुद्धगया येथेच तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने समस्त विश्वातील बौद्ध जनतेमध्ये महाबोधी महाविहार या विहारा प्रती मोठी सदभावना गुंतली असल्याने समस्त बौद्ध धम्मीयांच्या मध्ये श्रद्धा गुंतली असल्याने सदर महाबोधी महाविहार है बौद्ध धम्मीयांच्याच ताब्यात असल्या पाहीजेत. अशी मागणी सर्व देशातील बौद्धांच्यामध्ये निर्माण झाली आहे.मात्र, महाबोधी महाविहार ही हिंदूंनच्या ताब्यात असल्याने तथागतांच्या विचाराला बाजूला ठेऊन सर्व विधी होत असल्याने तथागतांच्या विचारांची मोडतोड होत आहे.त्यामुळे जगात चुकीचा संदेश जात असल्याने बौद्ध धर्मियांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. बौद्ध धम्मात बौद्ध भंन्ते यांना धम्मगुरुचे स्थान असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक दशके आंदोलन चालू आहे.

त्याची दखल शासन घेत नसून सदरचे आंदोलन मोडीत काढण्याचे काम बिहार सरकार करत आहे. जर या देशातील सर्व धार्मिक स्थळे त्या त्या धर्मातील जनतेच्या ताब्यात असताना या महाबोधी महाविहार या धम्म स्थळावर तर धर्मीयांचा ताबा कशासाठी ? हा प्रश्न संपूर्ण विश्वातील बौद्ध धर्मीयांमध्ये निर्माण झाल्याने याचे गांभीर्य लक्षात घेऊन हे महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची पुर्तता करण्यात यावी. तसेच बिहार सरकारने जो महाबोधी महाविहार संदर्भात जो टैम्पल अॅक्ट १९४९ मध्ये सहमत केला आहे.तो बौद्ध धर्मियांच्या दृष्टीने काळा कायदा आहे.तेव्हा तो कायदा तातडीने रद्द करण्यात यावा.अशीही मागणी करण्यात आली आहे.तेव्हा बिहार व केंद्र सरकारने तातडीने लक्ष घालावे. तसेच महामहीम राष्ट्रपती यांनी प्रत्यक्षपणे लक्ष घालून संबंधीत सरकारांना उचीत सुचना करून तातडीने संबंधीत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही करण्यात यावी.अन्यथा, समस्त बौद्ध जनतेला हे आंदोलन विश्वव्यापी करून त्याची तीवृता वाढवावी लागेल. याची सर्व जबाबदारी शासनावर राहील.”असेही निवेदनात म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here