अनिल वीर सातारा : महाबँक रिटायरीज असोसिएशनतर्फे (कोल्हापूर व सातारा युनिट) शुक्रवार दि.४ रोजी सायंकाळी ४ वा.येथील सुपनेकर हॉलमध्ये विश्वास उटगे यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.तेव्हा हितचिंतक,निवॄत्त बँक कर्मचारी /अधिकारी व अन्य नागरिक यांनी वेळेवर उपस्थीत रहावे. बँक निवृतांना बेसिक पेन्शन अपडेशन,आरोग्य विमा हप्ता बाबत आद्यावत माहिती व पुढील एक्शन प्लॅनबाबत विश्वास उटगी यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान होणार आहे.
विश्वास उटगी हे कामगार चळवळीतील आघाडीचे नेते आहेत. बँकिंग संघटनेत त्यांनी विविध टॉप पदावर काम केलेले आहे.तसेच विविध टीव्ही चॅनेलवर वेगवेगळ्या विषयावर डिबेट करणारे नेते आहेत.त्यामुळेच त्यांच्या व्याख्यानाचा लाभ सम्बधितांनी घ्यावा.तसेच सदरच्या सभेस कॉम.नेरुरकर (जन.सेक्रेटरी महा बँक रिटारीज असो. मुंबई.), कॉम.सुभाष मडके (अध्यक्ष, महा बँक रिटारीज असो.कोल्हापूर), कॉम. एस. एम. कुलकर्णी (कार्यकारी अध्यक्ष),कॉम. विलास राजमाने (संघटक सचिव) व कॉम. पी. जे. पाटील (उपाध्यक्ष, कोल्हापूर युनिट) उपस्थीत राहणार आहेत.अशी माहिती वसंत डिके (जॉइंट सेक्रेटरी) व दादासाहेब केंगार – (उपाध्यक्ष) यांनी दिली.