एस.टी. कामगार सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. आशाताई जगताप

0

फलटण : महाराष्ट्र एसटी कामगार संघटना पुरस्कृत श्रीराम पॅनेलने सोसायटी निवडणुकीत 15/0 ने एक हाती विजय मिळविला.या सोसायटीच्या चेअरमनपदी पहिल्यादाच एका महिला संचालकाला संधी मिळाली.
यावेळी सोसायटीच्या चेअरमनपदी आशाताई जगताप तर व्हाईस चेअरमनपदी हिंदुराव करे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवड प्रक्रियेसाठी सातारा विभागीय अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सातारा विभागीय सचिव अजित पिसाळ, सातारा विभागीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर घोणे, विभागीय संघटक सचिव सुशांत मोहिते, विभागीय खजिनदार प्रकाशराव पाटील, माजी बँक संचालिका सौ. लाडूताई मडके यांनी मार्गदर्शन केले..

संचालक मंडळ व सभासदांना आर्थिक दृष्ट्या सबळ बनवण्यासाठी व सभासदांना आर्थिक अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी सोसायटी 100 % पाठीशी उभी राहील. जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या विचारानुसार कामगार हिताचे निर्णय घेण्यात येतील, असा विश्वास नुतन पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

यावेळी आगार सचिव योगेश भागवत, अध्यक्ष बाळासाहेब सोनवले, उमेश निंबाळकर, नवनाथ पन्हाळे, राहुल जाधव, दादासो माने, सीताराम खवळे, दशरथ कदम, बाळासाहेब जगताप, विलास डांगे, सुरेश आडागळे, आप्पासो भोसले, दत्तात्रय कोळेकर, विकास राऊत, बापूराव कोलवडकर, निराप्पा वाघमोडे, निलेश बोधे, सुरेश अडागळे, देविदास निंबाळकर, गणेश सावंत, महेश गोसावी, सुरज तोडकर, गोरख पारखे, गोवेकर आदी सभासद उपस्थित होते. बाळासाहेब सोनवले यांनी आभार मानले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here