उपप्राचार्य प्रा.एमएम चमकुडे यांना पीएचडी प्रदान 

0

देगलूर प्रतिनिधी : येथील अडत व्यापारी शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे हिंदी विषयाचे अध्यापक तथा उपप्राचार्य प्रा. एम.एम.चमकुडे [पटेल]यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिंदी विषयात पीएचडी प्रदान केली आहे. त्यांनी “मंजूर आयतेश्याम का कथा साहित्य: एक अध्ययन “या विषयात शोध प्रबंध सादर केला आहे . या प्रबंध लेखनासाठी देगलूर महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. संतोष येरावार यांचे मार्गदर्शन लाभले आहे प्रा.चमकुडे यांच्या शोध प्रबंधास मान्यता देऊन ३ एप्रिल २०२५ रोजी पी.एच डी प्रदान करण्यात आली आहे 

 त्यांच्या या यशाबद्दलअडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर,उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार ,सचिव डॉ.कर्मवीर उनग्रतवार ,सहसचिव  राजकुमार शेठ महाजन, कोषाध्यक्ष  विलासशेठ तोटावार, कार्यकारणी सदस्य देवेंद्र मोतेवार , गंगाधरराव जोशी,  नारायणराव मैलागिरे , सूर्यकांतसेठ नारलावार,रविंद्र आप्पा द्याडे, चंद्रकांत नारलावार,गुरुराज चिद्रावार ,विजय उनग्रतवार  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन खताळ, उपप्राचार्य डॉ. अनिल चिद्रावार ,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.व्ही.जी .शेरीकर ,पर्यवेक्षक एस एन पाटील ,कार्यालयीन अधीक्षक  गोविंद जोशी , इर्शाद देशमुख भायगावकर यासह सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here