जामखेडच्या बँकेत बनावट सोने तारण ठेवून १७.७३ लाखाची फसवणूक

0

चार जणांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल; तीन आरोपींना अटक 

जामखेड तालुका प्रतिनिधी – कॅनरा बॅंकेत खातेदारांनी तारण ठेवलेले सोन्याच्या दागिन्यांचे कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय (जि. नाशिक) यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर जगन्नाथ रामदार सोनार यांनी दि.१३ मार्च रोजी क्चॉलीटी तपासणी केली असता खातेदारांनी बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले आहे. बनावट सोन्याचे दागिने ठेवुन रोख रक्कम कर्ज म्हणुन १७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली प्रकरणी जामखेड येथील गोल्ड व्हॅल्युअरसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे यामध्ये एका महीलेचा समावेश असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

जामखेड पोलीसात आनंद बाबासाहेब डोळसे (वय-३० वर्षे, धंदा-नोकरी (कॅनरा बँक मॅनेजर जामखेड), रा. शिक्षक कॉलणी जामखेड यांनी फिर्याद दिली की, बँक शाखेत ०३/०९/२०१८ पासुन गोल्ड व्हॅल्युअर म्हणून आण्णासाहेब नामदेव कोल्हे (रा. शिवम ज्वेलर्स बीड कॉर्नर जामखेड म्हणून कार्यरत आहेत. कॅनरा बँक जामखेड शाखेतील खातेदार मुनावर अजीम खान पठाण (रा. नुराणी कॉलणी जामखेड यांनी दि. २१/१०/२०२४ रोजी बँकेत सोन्याच्या चार नग बांगड्या वजन ६० ग्रॅम वजनाच्या व ४ नग सोन्याच्या अंगठ्या वजन ४० ग्रॅम असे एकूण १०० ग्रॅम सोने एकुण किंमत ५,८४,३७५/- रु. कि.चे असे सोन्याचे दागिणे तारण ठेवुन त्यांनी बैंक शाखेतुन ४,५५,०००/- रु. मुनावर अजिम खान पठाण यांच्या कर्ज खाते बँकेने जमा केलेली रक्कम खातेदार यांनी काढुन घेतलेली आहे.

दूसरे खातेदार महिला अनिता संतोष जमदाडे (रा. बाजारतळ जामखेड यांनी २३/१०/२०२४ रोजी बँकेत येवुन त्यांनी आमचे बँकेत सोन्याच्या २ नग बांगडया वजन ५३.५०० ग्रॅम च्या व ५ नग अंगठ्या वजन ९८.७०० ग्रॅम वजनाच्या एकूण वजन १५२.२०० ग्रॅम त्याची एकुण किंमत ८,६१,०५५/- रु. चे असे सोन्याचे बनावट दागिने तारण ठेवुन त्यांनी बैंक शाखेतून ६,७९,०००/- रु. उचलले

दि. ३०/१०/२०२४ रोजी बँक खातेदार दिगांबर उत्तम आजबे रा. आजबे वाडा, मेन रोड, जामखेड  हा सोने तारण करण्यासाठी बँकेत येऊन २ नग बांगड्या वजन ५० ग्रॅमच्या व १ नग सोन्याचे कडे वजन ३० ग्रॅम तसेच १ नग ब्रेसलेट वजन ४८.२०० ग्रॅमचे व २ नग सोन्याच्या अंगठ्या वजन १५.२०० ग्रॅम यांचे एकूण वजन १४३.७००/- यांची एकूण किंमत ८,५३,०१४/- रु. कि.चे असे बनावट सोन्याचे दागिने तारण ठेवुन त्यांनी बैंक शाखेतून ६,४८,०००/- रु. दिगांबर उत्तम आजबे यांनी उचलले

कॅनरा बँकेचे क्षेत्रिय कार्यालय जि. नाशिक यांचे मार्फतीने गोल्ड व्हॅल्युअर म्हणुन जगन्नाथ रामदार सोनार यांनी दि. १३/०३/२०२५ रोजी तारण ठेवलेल्या सोन्याचे दागिण्याची क्चॉलीटी तपासणी केली असता वरील खातेदार यांनी आमचे बँकेत तारण ठेवलेले सोन्याचे दागिने बनावट असल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. बॅंकेचा गोल्ड व्हॅल्युअर आण्णासाहेब कोल्हे, मुन्वर पठाण, डिगांबर आजबे व महिला अनिता जमदाडे यांनी संगनमत करून बॅंकेची १७ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. यातील महिला वगळता तीन आरोपींना अटक करून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here