औंध : औंध येथील उत्तरेकडील डोंगरावरील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री जोतिबा देवाच्या वार्षिक यात्रेनिमित्त गुरुवार, दि. १० रोजी औंध येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती यात्रा नियोजन कमिटीने दिली.
नांदोशी फाटा खबालवाडी रोडवरील पिराचे माळ याठिकाणी या शर्यती होणार आहेत. या स्पर्धेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
बैलगाडा शर्यत स्पर्धेतील पहिल्या सात विजेत्यांना अनुक्रमे एक लाख रुपये,71 हजार रुपये, 51 हजार रुपये,31हजार रुपये,21हजार रुपये,11हजार रुपये, 7 हजार रुपये अशी रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. त्याचबरोबर विजेत्या गाडी मालकांना ढाली देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रथम क्रमांकाच्या गाडीच्या ड्रायव्हरला ” श्री ज्योतिर्लिंग केसरी ड्रायव्हर” किताबाने सन्मानित केले जाणार आहे. मैदान यशस्वी करण्यासाठी जोतीराम कुंभार, अमित यादव, प्रशांत कुंभार, अभय कुंभार, अभिषेक कुंभार, मंदार कुंभार, प्रकाश कुंभार, सर्व कुंभार बांधव ,यात्रा कमिटी व औंध ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.