सातारा : महानवांच्या जयंतीचा महोत्सव विविध संघटनांच्या माध्यमातून सुरू झालेला आहे. उत्तरोत्तर जल्लोषाबरोबर फ्लेक्सही वाढत आहेत.तेव्हा डॉ.आंबेडकर पुतळा परिसरात महामानव यांच्या प्रतिमा व संघटनांची नावे फ्लेक्सवर ठिक आहेत.वैयक्तिक फोटो नसावेत. अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात प्राचार्य मोहन शिर्के,शिवनाथ जावळे,अनिल वीर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.तेव्हा,” वाढत्या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण थांबले पाहिजे.” या विषयांवर सकारात्मक चर्चा-विनिमय करण्यात आला.
व्यक्तिगत वाढदिवस, निवड व शुभेच्छापत्र अशी बॅनरबाजी इतरवेळी ठिक आहे. फ्लेक्स महामानवांच्या जयंती उत्सवामध्ये असलीं पाहिजे.तेव्हा बॅनरबाजीमध्ये महामानवांचे फोटो व विचार असले पाहिजेत. तेव्हा किमान पुतळा परिसरात तरी उत्साही कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी.काहींचे फ्लेक्स काढलेले आहेत.तेव्हा इतरांनीही बोध घेतला पाहिजे.अशी माफक अपेक्षा !