अनिल वीर सातारा : जिल्हा भारतीय बौद्ध महासभा (पूर्व) यांच्यावतीने जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महासचिव अरुण गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव तालुका यांच्यावतीने शनिवार दि.११ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा जोतिबा फुले यांची जयंती तालुक्याच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.तेव्हा तालुका कार्यकारणीतील सर्व कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन अनिल कांबळे,श्रीमंत घोरपडे आदी ज्येष्ट पदाधिकारी यांनी केले आहे.
सकाळी ८ वा. जळगाव नाका ते पंचायत समिती कोरेगाव या ठिकाणी बाईक रॅली काढायची आहे. त्यानंतर बाईकरॅली महात्मा फुले यांचे मूळ गाव कटगून या ठिकाणी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून वाठार किरोली या ठिकाणी दुपारी ३ वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे.यावेळी प्राचार्य शिवाजी सावंत यांचे मार्गदर्शन होणार आहे.तेव्हा अनेक मान्यवर उपस्थीत राहणार आहेत.