अनिल वीर सातारा : प्रत्येक गोष्टीचा पाया म.फुले यांनी घातला होता. त्यावर बाबासाहेबांनी कळस चढवला असल्याचे आढळून येत आहे.पुण्यात मांडलेले विचार डॉ.आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जगभरात पोहचविले.असे त्यांचे गुरू-शिष्याचे नाते होते. धर्मचिकित्साबाबत बाबासाहेबांनी ज्ञानचिकित्सा केली.म.फुलेंनी मांडलेली तत्वे बाबासाहेबांनी विस्तृत केली. असे प्रतिपादन ऍड. जयदीप गायकवाड यांनी केले.
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ संयुक्त जयंती समारोहतर्फे आयोजीत केलेल्या समाजसुधारक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ऍड.जयदेव गायकवाड (पुणे) यांचे,”म.फुले : डॉ.आंबेडकरांचे गुरू” या विषयावर व्याख्यान दिले. अध्यक्षस्थानी अध्यक्ष अक्षय कांबळे होते.यावेळी रमेश इंजे उपस्थीत होते.
ऍड. जयदीप गायकवाड म्हणाले,” म.फुले यांनी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक बाबासाहेबांनी सोडविले. त्यामुळे त्यांचे कर्तृत्व महान आहे. जगभरातील ज्ञानभांडारे बाबासाहेबांनी आत्मसात केल्याने विचारांचे स्मारक होईल.युद्धामुळे प्रश्न मिटत नाहीत.बाबासाहेबांची भूक बुद्धांची होती.म्हणूनच बुद्ध विचारानुसार लक्षवेधी वाटचाल बाबासाहेबांनी ठरली.सर्वोच्च विचारांचा पगडा बाबासाहेबांचा होता.विषमतेवर आधारित व्यवस्था होती त्याबाबत बाबासाहेबांनी विचार घेतला.विषमता बाबासाहेबाना मान्य नव्हती.फुले दाम्पत्यांनी पपहिल्यांदा शिक्षण भिडे वाड्यातून सुरू केले. बाबासाहेबांनी समाजव्यवस्थेबाबत परदेशी शिक्षण घेत अभ्यास केला होता.” अशा पद्धतीने ऍड.गायकवाड यांनी विविध उदाहनाद्वारे गुरू-शिष्याबद्धल सविस्तर माहिती कथन केली.
प्राचार्य डॉ.अरुण गाडे यांनी प्रास्ताविक केले.संदीप कांबळे यांनी स्वागत केले.गणेश वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले तर पुजाताई बनसोडे यांनी आभारप्रदर्शन केले.प्रथमतः डॉ.आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार ऍड.गायकवाड यांनी अर्पण करून अभिवादन केले.तद्नंतर सभास्थळी म.फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर,पदाधिकारी, पत्रकार,कार्यकर्ते उपस्थीत होते.