कोपरगाव प्रतिनिधी :कोपरगांव येथे ब्राह्यण सभेच्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्तानं पालखी व शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
ब्राह्मण सभा कोपरगावच्या वतीने सालाबाद प्रमाणे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव सोहळा अतिशय उत्साहाने संपन्न झाला. भगवान परशुराम जन्मोत्सव सोहळा निमित्तानं कोपरगांव शहरात सायंकाळी शोभायात्रेचे आयोजन मोठ्या स्वरुपात करण्यात आले. यामध्ये समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ब्राह्यण सभेच्या मंगल कार्यालयात ब्राह्यण सभेचे सकाळी अध्यक्ष मकरंद को-हाळकर,अनिल कंगले,.सचिन महाजन, .महेंद्र कुलकर्णी,अजिंक्य पदे आपल्या पत्नीसह पुजेला बसले. यांच्या हस्ते भगवान परशूरामाचे पुजन करण्यात आले.
सायंकाळी शोभायात्रेचे सुरुवातीला सर्वाचे स्वागत ब्राह्यण सभेचे सचिव सचिन महाजन यांनी केले.युवानेते संजीवनी कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांचे हस्ते भगवान परशुरामाचे पुजन करुन पालखीची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे पौरोहीत्य वेदशात्र संपन्न उमेश जोशी व त्यांचे सहकारी यांनी केले. या प्रसंगी गोदावरी दुध उत्पादक संघाचे अध्यक्ष .राजेश आबा परजणे,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,सौ.ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई,प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक,जेष्ठ विधिज्ञ जयंतराव जोशी,ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर,पत्रकार मनोज जोशी,सतिष कुलकर्णी आदि समाज बांधव उपस्थित होते.
या शोभायात्रेत विविध सामाजिक संदेशाचे फलक घेवुन समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न झाला.त्यात पर्यावरण,पाणी बचतीचे महत्त्व,बेटी बचाव,वृक्षांचे संवर्धन इ.बाबीचा समावेश होता या प्रयत्नाचे सर्वानी खुप कौतुक केले.
गावातील रेणुका माता देवीच्या मंदीरा मध्ये आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते रेणुका मातेची व भगवान परशूरामाची विधिवत पुजा करण्यात आली.
या शोभायात्रेचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज पुतळा जवळ झाला. शोभा यात्रेच्या समारोप प्रसंगी ब्राह्मण समाज महिला मंडळाचे हस्ते आरती करण्यात आली.
ब्राह्यण सभेचे उपाध्यक्ष बी.डी.कुलकर्णी यांनी आभार मानले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन खजिनदार जयेश बडवे यांनी केले.तर शोभा यात्रेचे संयोजन संजीव देशपांडे व संघटक महेंद्र कुलकर्णी यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ब्राह्यण समाज महीला मंडळाच्या अध्यक्षा अॕड.सौ.श्रध्दा जवाद व कार्यकारिणी, उपाध्यक्ष राजेंद्र जवाद,.वसंतराव ठोंबरे,मिलींद धारणगांवकर,संदीप देशपांडे,अजिंक्य पदे,गौरीश लव्हरीकर,योगेश कुलकर्णी ,सौ.वंदना चिकटे,सदाशिव धारणगांवकर,अनिल कुलकर्णी आदी पदाधिकारी समाज बांधव यांनी विशेष प्रयत्न केले.या शोभायात्रेत बहुसंख्य पुरुष व महीला समाज बांधव भगवे फेटे परिधान करुन असल्याने सगळे वातावरण भगवेमय झाले होते.