[ad_1]
Prithvi Shaw With His New Girlfriend Video Viral: टीम इंडियाचा खेळाडू पृथ्वी शॉ नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या खेळाबद्दलच नाही तर तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. अलीकडेच पृथ्वी शॉचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तो एका मुलीसोबत त्याच्या गाडीतून कुठेतरी जाताना दिसत आहे. दरम्यान, काही पत्रकारांनी त्याचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो फोटोसाठी नकार देताना दिसला. एवढेच नाही तर त्याच्यासोबत असलेली त्या मुलगी तिच्या पर्सने चेहरा लपवताना दिसली. यामुळे आता असे प्रश्न पडले आहेत की पृथ्वी शॉने त्याची एक्स प्रेयसी निधी तापडियाला फसवले आहे का? पृथ्वी शॉला नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे का? जर नाही, तर ती मुलगी कोण आहे जी त्याच्या गाडीत बसून कॅमेऱ्यापासून चेहरा लपवताना दिसते? या प्रश्नांसोबतच त्याची एक्स प्रेयसी निधी टपारियाची ती इन्स्टा स्टोरी बघून तुम्हाला तिच्या मनातील वेदना दिसून येतील.
निधी तापडियाची पोस्ट
निधी तापडिया पेशाने एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. आतापर्यंतच्या चर्चनुसार निधी तापडिया ही पृथ्वी शॉ ला डेट करत आहे. तो तिच्याशी रिलेशनशिपमध्ये आहे. पण आता पृथ्वी शॉचे नवीन मुलीसोबतचे व्हिडीओ समोर आल्यानंतर निधी तापडियाचे दुःख ज्या प्रकारे समोर आले आहे, त्यावरून तिला या घटनेने खूप दुःख झाले आहे हे सांगण्यास पुरेसे आहे. निधी तापडियाने तिच्या इंस्टा स्टोरीमध्ये पृथ्वी शॉबद्दल लिहिले आहे – ‘आधी त्याच्या सर्वात वाईट काळात त्याला साथ द्या आणि नंतर त्याला विश्वासघात करताना पहा’.
हे ही वाचा: IPL मध्ये लागली नाही बोली, तरीही कमावले 380000000; कोण आहे हा खेळाडू? जाणून घ्या
पृथ्वी शॉची नवी प्रेयसी?
सध्या तरी, पृथ्वी शॉने निधी तापडियाला चिट केले की नाही याबद्दल अजून स्पष्टता नाहीये. दरम्यान दुसरीकडे, फिल्मी ग्यानने पृथ्वी शॉचा एका नवीन मुलीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो त्या मुलीसोबत दिसत आहे. आता ही नवीन मुलगी कोण आहे, हे अद्याप समजू शकत नाही.
हे ही वाचा: सारा की अवनीत… शुभमन गिल कोणासोबत आहे रिलेशनशिपमध्ये? स्वतःच केला खुलासा, म्हणाला – 3 वर्षांपासून…
हे ही वाचा: 3 चित्रपटांनी केली 3200 कोटींची कमाई, बनली 29 व्या वर्षी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री; तुम्ही ओळखू शकता कोण आहे ही सुंदरी?
निधी टपारियाची इन्स्टा स्टोरी पाहिल्यानंतर आणि व्हायरल झालेला व्हिडीओ बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होत आहे की पृथ्वी शॉ अजूनही क्रिकेटमध्ये पुन्हा ट्रॅकवर येण्यावर लक्ष केंद्रित करत नाही. एक काळ असा होता जेव्हा पृथ्वी शॉ हा टीम इंडियाचा भविष्य मानला जात असे.
[ad_2]