फोन 100 टक्के चार्ज करणं धोकादायक ठरू शकतं! जाणून घ्या मोबाईल चार्जिंगचे योग्य नियम

0

[ad_1]

आजच्या काळात मोबाईलशिवाय जीवन अशक्य झाले आहे. कॉल्स, चॅटिंग, कामं, बँकिंग, GPS, फोटो आणि अगदी आरोग्याशी संबंधित अ‍ॅप्ससुद्धा या मोबाईलमध्येच असतात. त्यामुळे फोन सोबतच त्याची बॅटरी टिकवणं ही गरज बनली आहे.

बॅटरी खराब होण्याची कारणं:
1. 100 टक्के चार्जिंग- लिथियम आयन बॅटरीसाठी पूर्ण चार्जिंग योग्य नाही. यामुळे बॅटरी फुगू लागते.
2. रात्रभर चार्जिंग- रात्रभर फोन चार्जिंगला लावल्यामुळे ट्रिकल चार्जिंग सुरू राहतं. जे बॅटरीचे नुकसान करते.
3. फास्ट चार्जिंगचा अति वापर- गरज नसताना वारंवार फास्ट चार्जिंग केल्याने बॅटरी गरम होते आणि लवकर खराब होण्याचा धोका वाढतो.
4. गरम वातावरणात चार्जिंग करणे म्हणजेच उन्हात किंवा उष्ण ठिकाणी फोन चार्जिंगला लावणे टाळा.
5. खोट्या किंवा डुप्लिकेट चार्जरचा वापर अत्यंत धोकादायक असते. यामुळे बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.

मोबाईल बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी टिप्स:
चार्जिंग रेंज योग्य ठेवा. 20 टक्के ते 80 टक्के ही रेंज बॅटरीसाठी सर्वोत्तम मानली जाते. यामुळे चार्जिंग सायकल जास्त काळ टिकते.
स्मार्ट चार्जिंग वापरा. अनेक मोबाईल ब्रँड्स आता Optimized Charging फीचर देतात. याचा उपयोग केल्यास बॅटरी गरजेनुसार चार्ज होते.
फोन उष्णतेपासून वाचवा. गरम ठिकाणी फोन ठेवू नका. चार्जिंगदरम्यान मोबाइलच्या कव्हरचा वापर टाळल्यास उष्णता राहणार नाही.
बॅटरी सेव्हिंग मोड वापरा. विशेषतः बॅटरी कमी असताना हे मोड्स वापरल्यास चार्जिंग दीर्घकाळ टिकते.
ब्लूटूथ, Wi-Fi, लोकेशन गरज नसताना बंद ठेवा. यामुळे बॅटरीचा अपव्यय टाळता येतो.
‘डार्क मोड’ आणि ‘अ‍ॅडाप्टिव्ह ब्राईटनेस’ चा वापर करा. हे फीचर्स स्क्रीनवरील उजेड कमी करून बॅटरी वाचवतात.

खास लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी मोबाईलच्या सेटिंगमध्ये असलेली माहिती (जसे iPhone मध्ये Battery Health) नियमितपणे पाहा.
नवीन सॉफ्टवेअर अपडेट्स इन्स्टॉल करत राहा. कारण त्यात बॅटरी व्यवस्थापन सुधारलेले असते.
जर बॅटरी लवकर संपत असेल, फोन खूप गरम होत असेल किंवा चार्ज हळूहळू होत असेल. तर शक्यतो सर्व्हिस सेंटरलाच भेट द्या.

100 टक्के चार्जिंग ही चुकीची सवय आहे. फोन लवकर खराब होण्यामागे हेच एक मोठी कारणं आहे. स्मार्टफोनची दीर्घायुष्यासाठी 20 टक्के ते 80 टक्के चार्जिंग पद्धत अवलंबा आणि अनावश्यक चार्जिंग सवयी टाळा.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here