[ad_1]
Virat Kohli Retirement: भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली. यानंतर त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. आता टीम इंडियाचा आणखी एक फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार अशा चर्चा सुरु आहेत. विराटने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ नये असे त्याच्या चाहत्यांना वाटतंय. अनेक क्रिकेटर्सनीदेखील हे मत व्यक्त केलंय. दरम्यान वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लारानेदेखील यावर प्रतिक्रिया दिलीय.
36 वर्षीय विराट कोहली खेळाच्या सर्वात लांब फॉरमॅटमध्ये न खेळण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय. या निर्णयाबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळा म्हणजेच बीसीसीआयशी त्याने संपर्क साधला होता. पण विराट कोहलीला या निर्णयाचा एकदा पुनर्विचार करावा असे बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याची माहिती सुत्रांकडून समोर येतेय.
विराट कोहलीबद्दल ब्रायन लाराची नवीन पोस्ट
ब्रायन लाराने त्याच्या इंस्टाग्रामवर विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल पोस्ट केलीय. या पोस्टमध्ये ब्रायन लाराने कोहलीचं कौतुक केलं. कसोटी कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त सरासरीने फलंदाजी करण्यासाठी कोहलीला पाठींबा दिला. लाराने लिहिले, ‘कसोटी क्रिकेटला विराटची गरज आहे!! हे त्याला पटवून दिले जाईल. तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार नाही. विराट कोहली त्याच्या उर्वरित कसोटी कारकिर्दीत 60 पेक्षा जास्त सरासरीने धावा करणार असल्याचे’, लारा म्हणाला.
‘इंग्लंड मालिकेसाठी नवीन कर्णधाराची निवड करावी’
2024-25 बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी गेला होता पण तेव्हा त्याचा फॉर्म चांगला नव्हता. पण पर्थमधील दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले आणि भारताने तो सामना 295 धावांनी जिंकला. त्यानंतर कोहलीचा फॉर्म गेला आणि भारताने मेलबर्न, अॅडलेड आणि सिडनी येथे पराभवांसह मालिका 1-3 अशी गमावली. रोहित शर्माने अलीकडेच त्याच्या 11 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीचा अंत केलाय. आता तो आगामी इंग्लंड कसोटी मालिकेत खेळताना दिसणार नाही आणि या मालिकेसाठी टीम इंडियाला नवीन कर्णधार निवडावा लागेल.
विराटचे करियर
विराट कोहली फक्त 36 वर्षांचा आहे आणि तो आणखी काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकतो. त्याचा फिटनेसची खूप उत्तम आहे. त्यामुळे ही बातमी त्याच्या चाहत्यांना निराश करू शकते. विराट कोहलीने आतापर्यंत भारतासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. या कसोटी सामन्यांमध्ये विराटने 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके आणि 31 अर्धशतके केली आहेत. विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 7 वेळा डबल शतके केली आहेत.
BCCI लवकरच करणार सांघाची निवड
रोहित शर्मा पाठोपाठ कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर आता विराट कोहलीचा हा निर्णय टीम इंडियासाठी चांगला नसेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) निवड समिती पुढील महिन्यात इंग्लंडमध्ये होणाऱ्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी लवकरच संघ निवडणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेपासून विराट कोहलीच्या निवृत्तीबद्दल चर्चा होती. तो तेव्हापासूनच या निवृतीचा विचार करत असल्याचे म्हटले जाते.
[ad_2]