IPL 2025 likely to resume from the next week according to reports after ind pak ceasefire | भारत

0

[ad_1]

IPL 2025 : मागील अनेक दिवसांपासून भारत – पाकिस्तान यांच्यात तणाव सुरु होता. पाकिस्तानकडून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हे हल्ले भारताने यशस्वीपणे परतवले. तसेच भारताने सुद्धा पाकिस्तानवर प्रतिहल्ले करून त्यांचा चोख उत्तर दिलं. मात्र यानंतर 10 मे सायंकाळी 5 वाजल्या पासून भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धाला विराम लागला आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. भारत – पाक तणाव परिस्थितीचा परिणाम आयपीएल 2025 वर सुद्धा झाला होता आणि एका आठड्यासाठी आयपीएल स्थगित करण्यात आलेली. मात्र आता शस्त्रसंधीची घोषणा झाल्याने पुढील आठवड्यापासून पुन्हा आयपीएल सामन्यांना सुरुवात होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून वर्तवली जात आहे. 

7 मे रोजी पाकिस्तानने भारतातील काही शहरांवर ड्रोन हल्ले करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धर्मशाला स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना सुरु होता. मात्र हल्ल्याच्या भीतीने स्टेडियमवर ब्लॅक आउट करण्यात आलं आणि सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर बीसीसीआयने आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता स्पोर्ट्स तकने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीसीसीआय लवकरच याबाबत निर्णय जाहीर करू शकतो. 

IPL 2025 चे 12 सामने शिल्लक : 

आयपीएल 2025 मधील 74 सामन्यांपैकी 12 लीग स्टेज सामने आणि 4 प्लेऑफ सामने शिल्लक आहेत. आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here