[ad_1]
ECB Offer To BCCI After IPL 2025 Postponement: भारत – पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड आणि आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने भारतात सुरु असलेली आयपीएल 2025 ही स्पर्धा एका आठवड्यासाठी स्थगित केली आहे. त्यामुळे सध्य परिस्थितीत पुढील आठवडाभर आयपीएलचे सामने होणार नाहीत. तणावपूर्ण परिस्थितीत आठवड्याभरानंतर आयपीएल 2025 (IPL 2025) कशी खेळवण्यात येणार, त्याचे सामने भारतातच होणार की विदेशात याबाबत अनेक प्रश्न आहेत. या परिस्थितीमध्ये इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) आयपीएल 2025 साठी (IPL 2025) बीसीसीआयला मदतीचा हात दिला आहे.
स्टेडियमला मिळाले धमकीचे ईमेल :
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतातील अनेक शहरांना पाकिस्तानच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोन द्वारे लक्ष्य करण्यात आले होते. हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आल्याने धर्मशाला स्टेडियमवर गुरुवारी पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना 10.1 षटकांनंतर रद्द करण्यात आला, ज्यामुळे आयपीएल 2025 च्या सुरक्षेच्या मोठ्या चिंता निर्माण झाल्या होत्या. आयपीएलचे सामन्यांचे आयोजन करण्यात येणाऱ्या अनेक स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याचे अनेक ईमेल सुद्धा पाठवण्यात आले. यात अहमदाबादचं नरेंद्र मोदी स्टेडियम, कोलकाताचं इडन गार्डन, राजस्थानच सवाई मानसिंह स्टेडियम, दिल्लीचं अरुण जेटली स्टेडियम इत्यादी काही स्टेडियमचा समावेश होता.
इंग्लंड बोर्डाने पुढे केला मदतीचा हात :
बीसीसीआयने शुक्रवार 9 मे रोजी दुपारी भारत – पाकिस्तान तणाव स्थितीमुळे आयपीएल 2025 एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात येणार असे जाहीर केले. यानंतर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला आयपीएल 2025 चा सीजन पूर्ण करण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. आयपीएल 2025 चे उर्वरित सामने हे इंग्लंडमध्ये खेळवले जाऊ शकतात अशी ऑफर इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला दिल्याची माहिती The Cricketer ने दिली आहे. तेव्हा बीसीसीआय हे ऑफर स्वीकारते का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
IPL IN ENGLAND
England Cricket Board has offered BCCI a possible arrange to complete the IPL 2025 in England. [The Cricketer] pic.twitter.com/us6xY2mHay
— Johns. (CricCrazyJohns) May 9, 2025
BCCI चे उपाध्यक्ष राजीव शुल्का काय म्हणाले?
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी मीडियाला प्रतिक्रिया देताना सांगितले की, ‘आम्ही सर्व स्टेकहोल्डर्स सोबत बोलणी करू आणि मग ठरवू की सामने कसे आयोजित केले जावेत. तसेच विदेशी खेळाडू स्वतः ठरवतील की त्यांना एक आठवडा इथेच भारतात राहायचंय की आपल्या देशात परत जायचंय. वाढत्या तणावामुळे आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आलं आहे. आयपीएल पुढे होणार की नाही आणि कुठे होणार याचा निर्णय गवर्निंग काउंसिलद्वारे घेतला जाईल. या महत्वाच्या टप्प्यावर बीसीसीआय अतिशय मजबुतीने देशासोबत उभा आहे’.
[ad_2]