TATA IPL 2025 suspended for one week with immediate effect BCCI prioritizes national security | IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य

0

[ad_1]

BCCI Suspends IPL for a week: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगने एक मोठा निर्णय घेतला आहे. इंडियन प्रीमियर लीगला एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी BCCI ने हा निर्णय घेतला आहे. BCCI ने स्पष्ट केले की राष्ट्राच्या सार्वभौमत्वापेक्षा काहीही मोठे नाही.

काय म्हणालं बीसीसीआय?

बीसीसीआयच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की, ” IPL गव्हर्निंग कौन्सिलने सर्व भागधारकांशी, फ्रँचायझींसोबत सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे. बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता आणि भावना लक्षात घेऊन आणि प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांचे मत व्यक्त घेतल्यानंतर सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे.”  बीसीसीआय आपल्या सशस्त्र दलांच्या ताकदीवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास ठेवत असल्याचे बोर्डाने सांगितले. बोर्डाने सर्व भागधारकांच्या सामूहिक हितासाठी कार्य करणे शहाणपणाचे मानले. Jiostar, TATA आणि इतर भागधारकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. 

सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम, राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा BCCI चा निर्णय घेण्यात आला. IPL च्या नवीन वेळापत्रकाची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. 

बीसीसीआयने निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार, ” या महत्त्वाच्या टप्प्यावर, बीसीसीआय देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत उभे आहोत.  बोर्ड आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो.” या आधी  बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते की, “देश युद्धात असताना क्रिकेट चालू राहणे चांगले वाटत नाही.” 

राष्ट्राच्या सार्वभौमत्वापेक्षा काहीही मोठे नाही

‘क्रिकेट हा राष्ट्रीय आवड असला तरी, आपल्या देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षिततेपेक्षा मोठे काहीही नाही. भारताचे रक्षण करणाऱ्या सर्व गोष्टींना  पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय वचनबद्ध आहे आणि नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेईल.’ असेही पुढे सांगण्यात आले आहे. 

खेळाडूंनी भारतीय सैन्याचे केले कौतुक आणि मानले आभार 

 

 

 

सध्या सुरु असेलल्या भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतातील अनेक शहरांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य करण्यात आले होते. हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आल्याने  पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना १०.१ षटकांनंतर रद्द करण्यात आला, ज्यामुळे आयपीएल २०२५ च्या सुरक्षेच्या मोठ्या चिंता निर्माण झाली होती. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here