auto news tata altroz facelift 2025 launch in india price features and specifications

0

[ad_1]

TATA Altroz facelift Launch in India: ऑटो क्षेत्रात (Auto News) भारताचा विचार करायचा झाल्यास इथं काही कंपन्यांच्या वाहनांना सतत प्राधान्य मिळत असल्याचं पाहायला मिळतं. अशाच कंपन्यांपैकी एक नाव म्हणजे टाटा. मुळातच या ब्रँडनं विविध क्षेत्रांमध्ये निर्माण केलेली विश्वासार्हता इथं त्यांच्यासाठी प्रचंड फायद्याची ठरत असून, ऑटो क्षेत्रात त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. टाटानं नुकतीच लाँच केलेली कार पाहून याची प्रचिती येत आहे. कारण, ठरतंय कारला मिळणारा प्रतिसाद. 

भारतात नुकतीच Tata Altroz facelift लाँच करण्यात आली असून या कारसाठी 6.89 रुपये (एक्स-शोरूम) इतकी किंमत मोजावी लागत आहे. प्रिमियम अपडेट्ससह लाँच करण्यात आलेली ही कार आधीपेक्षा अधिक प्रभावी दिसत असून, कारच्या इंटेरिअरपासून एक्सटिरीअरपर्यंत बरेच बदल करण्यात आले असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठीसुद्धा कारमध्ये महत्त्वाच्या गोष्टी जोडण्यात आल्या आहेत. 

5-स्पीड मॅन्युअल या 6-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गियरबॉक्ससह 88hp जनरेट करणारं 1.2-लीटर पेट्रोल इंजिन आणि 5 स्पीड मॅन्युअलसह 74hp जनरेट करणारं फॅक्ट्रीफिटेड सीएनजी वर्जन आणि 5 स्पीड मॅन्युअलसह 90hp पॉवर जनरेट करणारं 1.5 लीटर इंजिन देण्यात आलं आहे. 

डिझाईन आणि फिचर्स कमाल… 

टाटाच्या अल्ट्रोज फेसलिफ्टमध्ये अपडेटेड फ्रंटएंड दिलं असून, यामध्ये डे-टाइम रनिंग लाइट्ससाठी अपडेटेड सिग्नेचर देण्यात आलं आहे. कारमध्ये फुल एलईडी स्प्लिट हेडलाईट, नवं ग्रिल डिझाईन, फॉग लँप हाऊसिंगसाठी वर्टिकल रिसेस अशा गोष्टी नव्यानं जोडण्यात आल्या आहेत. शिवाय कारला 16 इंच 5 स्पोक अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. 

हेसुद्धा वाचा : Corona News : पुन्हा घ्यावा लागणार बूस्टर डोस? भारतासह ‘या’ 5 आशियाई देशांमध्ये कोरोना रुग्णांमुळे वाढली चिंता

कारच्या रिअरविषयी सांगावं तर, रिअर अर्थात मागच्या बाजूला हॉरिजॉन्टल टी-शेप के एलईडी टेल-लँप देत टेलगेटच्या खालच्या बाजूला स्पोर्टीअर ड्युअल टोन रिअर बम्पर आणि अल्ट्रोज असं लेटरिंगसुद्धा आहे. की कार रॉयल ब्लू, ड्यून ग्लो, एम्बर ग्लो, प्रिस्टीन व्हाइट, प्योर ग्रे अशा रंगांमध्ये कंपनीनं विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहे. राहिली जमेची बाजू, तर कारमध्ये इलेक्ट्रीक सनरूफ, क्रूज कंट्रोल , रिअर एसी वेंट, एम्बिएंट लायटिंग, 90 डिग्री उघडणारे दरवाजे, ऑटोमॅटिक हेडलाईट्स, वायपर आणि 360 डिग्री कॅमेरा असेही फिचर्स जोडण्यात आले आहेत. त्यामुळं एखाद्या उत्तम फॅमिली कारच्या शोधात असाल, तर टाटाची अल्ट्रोज एक उत्तम पर्याय असेल या वाद नाही. 



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here