ayush mhatre u19 team india captain for england series vaibhav suryavanshi also selected in team

0

[ad_1]

U19 Team India : इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखली जाते. इथे अनेक नवे क्रिकेटर्स दमदार कामगिरी करून नावारूपाला येतात आणि त्यानंतर त्यांना भारतीय संघात सुद्धा संधी मिळते, अशी अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत. आता आयपीएल 2025 मध्ये पदार्पण करणाऱ्या मुंबईकर खेळाडू आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) आणि वैभव सूर्यवंशी ( Vaibhav Suryavanshi) यांना अंडर 19 भारतीय संघात संधी मिळाली आहे. आयपीएल 2025 मध्ये (IPL 2025) चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळणारा आयुष म्हात्रे याच्याकडे अंडर 19 भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले आहे. हे दोन्ही खेळाडू यापूर्वी श्रीलंकामध्ये झालेल्या अंडर 19 आशिया कपचा सुद्धा भाग राहिले आहेत. 

अंडर 19 भारतीय संघाचा इंग्लंड दौरा : 

जून महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय अंडर 19 संघाला 50 ओव्हरचा सराव सामना खेळायचा आहे. त्यानंतर 5 सामन्याची यूथ वन-डे सीरीज आणि इंग्लंड अंडर-19 विरुद्ध भारतीय संघाला दो मल्टी-डे सामने खेळायचे आहेत. 

team india

आयपीएलमधील सर्वात तरुण शतकवीर : 

वैभव सूर्यवंशी याला राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल 2025 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. बिहारच्या समस्तीपुरचा हा युवा खेळाडू आयपीएलमध्ये खेळणारा तसेच शतक लगावणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. गुजरात टायटन्स विरुद्ध त्याने 35 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं. त्याचं हे शतक आयपीएलच्या इतिहासातील दुसरं सर्वात वेगवान शतक होतं. बिहारसाठी 5 प्रथम श्रेणी सामन्यात त्याने 5 लिस्ट ए सामने खेळले आहेत. तर मागच्या वर्षी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध अंडर-19 सामन्यात त्याने यूथ टेस्टमध्ये शतक लगावले.  वैभव सूर्यवंशी 14 वर्षांचा आहे. 

हेही वाचा : धोनीला ठेवा पण ‘या’ 7 खेळाडूंना टीममधून काढा, IPL 2026 साठी CSK ला सल्ला; ही यादी एकदा पाहाच

 

17 वर्षांचा आयुष म्हात्रे टीम इंडियाचा कर्णधार : 

मुंबईकर खेळाडू आयुष म्हात्रे याला चेन्नई सुपरकिंग्सकडून आयपीएल 2025 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली होती. सिएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे बाहेर पडल्याने आयुष म्हात्रेला चेन्नईकडून बोलावणं आलं. 94 धावांची दमदार खेळी करून आयुषने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. आयुष म्हात्रेला 30 लाखांना करारबद्ध करण्यात आलं होतं. त्याने 9 फर्स्ट क्लास सामन्यात आणि 7 लिस्ट ए सामन्यात 962 धावा केल्या आहेत. 

अंडर 19 भारतीय संघ (इंग्लंड दौरा) :

आयुष म्हात्रे (कर्णधार), वैभव सूर्यवंशी, विहान मल्होत्रा, मौल्यराजसिंह चावड़ा, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (उप-कर्णधार आणि विकेटकीपर), हरवंश सिंह (विकेटकीपर), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, खिलान पटेल, हेनिल पटेल, युद्धजीत गुहा, प्रणव राघवेंद्र, मोहम्मद एनान, आदित्य राणा, अनमोलजीत सिंह

स्टॅन्डबाय खेळाडू : नमन पुष्पक, डी दीपेश, वेदांत त्रिवेदी, विकल्प तिवारी, अलंकृत रापोल (विकेटकीपर)



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here