नागरीक संघातर्फे अनिल वीर यांना मानपत्र प्रदान

0

सातारा : येथील सम्यक ज्येष्ट नागरीक संघातर्फे बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर यांना अभिष्टचिंतनपर मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. येथील माऊली हॉटेलमध्ये संघाचे शासमराव बनसोडे, बी.एल.माने व सर्व सदस्य यांच्यावतीने अनिल वीर यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.

यावेळी अंकुश धाइंजे, अशोक भोसले,बबन झोरे, चंद्रकांत खंडाईत, दादासाहेब केंगार,मंगेश डावरे,गणेश कारंडे,ऍड.विलास वहागावकर, मकरंद केंगार, पी.टी.कांबळे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते. ऍड.वहागावकर यांनी आणलेला केक कापण्यात आला. उपस्थितांनी वीर यांच्या शुभेच्छापर वर्षाव केला.शेवट अल्पोपहाराने झाला. बी.एल.माने यांनी प्रास्ताविक केले.मानपत्राचे वाचन माणिक आढाव यांनी केले तर शामराव बनसोडे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here