तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचे का? पोलिसाचे वक्तव्य
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद रोडलगत असणाऱ्या विवेक विक्रम खेडकर यांच्या मालकीच्या खेडकर ज्वेलर्स हे सोने व चांदीचे दुकान काल गुरुवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला.दुकान मालक खेडकर यांनी राहुरी फँक्टरी येथिल बिट अंमलदारास फोन करुन दुकान फोडण्याचा प्रयत्न केल्याची माहीती दिली असता बिट अंमलदार यांनी तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचे का? असे पोलिसाने दुकान मालकास सांगितल्याने दुकान मालक व्यथित झाला असून चोरांना पकडण्याची जबाबदारी नेमकी पोलिसाची की दुकानदारांची असा प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमा समोर ठेवला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की,राहुरी फॅक्टरी येथील ताहराबाद रोडच्या लगत विवेक खेडकर यांचे खेडकर ज्वेलर्स हे सोने चांदीचे दुकान असून काल गुरुवारी पहाटेच्या दरम्यान दोन अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने कुलूप तोडून दुकान फोडण्याचा प्रयत्न केला.दुकानाच्या पाठीमागील बाजूस खेडकर राहावयास असून त्यांच्या घराला बाहेरून काडी लावून चोरट्यांनी दुकान फोडण्याचा प्रयत्न केला.सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.दुकानाचे कुलपे गँस कटरच्या साहय्याने तोडीत असताना एक गाडी दुकाना समोरुन गेली त्यामुळे चोरांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.
दुकान मालक विवेक खेडकर यांना पहाटे दुकान फोडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे समजताच खेडकर यांनी राहुरी फँक्टरीचे बीट हवालदार शेळके यांना दुकान फोडल्याची माहिती भ्रमणभाषवरुन दिली असता पोलिस दादांनी तुमच्यासाठी आमच्या घरादारावर पाणी सोडायचे का? असे दुकान मालकास सांगितले.पोलिसाच्या या वक्तव्यामुळे दुकान मालक व्यथित झाला आहे.चोरांना पकडण्याची जबाबदारी नेमकी पोलिसाची की दुकानदारांची असा प्रश्न दुकान मालक विक्रम खेडकर यांनी प्रसार माध्यमांना विचारला आहे.पोलिस जर असे वागणार असतील तर दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान राहुरी फॅक्टरी परिसरात अनेक दिवसा पासून चोऱ्यांच्या घटना वाढल्या आहेत.आज पर्यंत झालेल्या चोऱ्यांचा तपास लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत.वाढत्या चोऱ्यां लक्षात घेवून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.