श्री शनी मंदिर श्री संकटमोचन हनुमान मंदिर जन्मोत्सव सोहळा आयोजन.

0

नांदेड प्रतिनिधी ;- हडको येथील श्री शनी मंदिर,श्री संकटमोचन हनुमान मंदिर देवस्थान येथे 22वा श्री शनी जन्मोत्सव सोहळा 27 में रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी 51 किलो तेलांचा अभिषेक प्रविण महाराज टोंगे यांच्या अधिपत्या खाली होणार असून शनि महात्म्य, महाआरती व महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

 

 गेल्या तिस वर्षांनंतर यावर्षी श्री शंकर भगवान व लाडक्या शिष्यांचा जन्मोत्सव एकच दिवशी येत आहे.27 में रोजी सकाळी 6 वाजता सामुदायिक अभिषेकाचे आयोजन करण्यात आले आहे, त्यानंतर हनुमान चालीसा व शनिचालीसाचे पठण झाल्यानंतर आरती होईल,तर सकाळी 10 ते 12 शनि महात्म्य वाचन,शिवकलाबाई पाटील ,सौ.आशा‌ संजय जोशी सुचक  हभप गोविंदराव पाटील गिरे ,विठ्ठलराव गिते,हभप हभप सुरेश कल्याणकर, होणार आहे.दुपारी 12 वाजता महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

 

आजीवन अभिषेक यजमान यांच्या हस्ते अभिषेक,तर श्री शनि जन्मोत्सव आजीवन अन्नदाते यांच्या हस्ते प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. या सोमवती अमावास्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष करणसिंह ठाकूर, माधवराव कदम, गोपीनाथ कहाळेकर,संजय जाधव पाटील व विश्वस्त मंडळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here