नांदेड प्रतिनिधी :- नांदेड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेला नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळातुन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपा नांदेड महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजुरकर यांनी धनेगाव येथे आयोजित बैठकीत केले. भाजपा महानगर नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ संघटनात्मक बैठकीचे आयोजन धनेगाव येथे गंगाधर शिंदे यांच्या संपर्क कार्यालय येथे 23 में रोजी भाजपा महानगर अध्यक्ष माजी आमदार अमरभाऊ राजुरकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली,या बैठकीचे आयोजन माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे यांनी केले होते, या वेळी माजी महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, नांदेड दक्षिण विधानसभा मंडळ अध्यक्ष विश्वंभर शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाप्रसाद काकडे, जयप्रकाश पाटील येवले,
माजी नगरसेवक राजू पाटील काळे,सरपंच पिंटू ऊर्फ गंगाधर शिंदे,साहेबराव सेलुकर,पुंडलिक मस्के,सरपंच प्रतिनिधी प्रदीप लाखे, रवि देशमुख , डॉ. कालिदास मोरे भागवत शिंदे,रमेश तालीमकर, तातेराव पाटील,देवराव काकडे ,माजी पंचायत समिती सदस्य कैलास जाकापुरे ,शैलेंद्र ठाकूर , डॉ.प्रकाश स्वामी,दता पाटील शिंदे, संग्राम निलपत्रेवार,विकास कदम,यांच्या सह दक्षिण विधानसभा मतदारसंघ संघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नांदेड येथील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जाहीर सभेचे आयोजन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले असल्याचे सांगून या सभेला नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी यांनी आप आपल्या गावातील नागरीक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहण्या साठी विनंती करावी असे आवाहन या वेळी केले,आगामी निवडणुक दृष्टीने सर्कल व पंचायत समिती आढावा घेतला.
माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,गंगाप्रसाद काकडे,माजी नगरसेवक राजू पाटील काळे,रमेश वाघमारे,गजानन उबाळे ,यांनी भाजपा पक्षाची एक हजार नावनोंदणी करण्यात आलेल्या पदाधिकारी यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक नांदेड भाजपा विधानसभा मतदार विश्वभार शिंदे यांंनी जिल्हा परिषद सर्कल असलेल्या बळीरामपुर ,वाजेगाव सोनखेड ,सह पंचायत समिती गण निहाय यांच्या सह ग्रामीण भागातील समाविष्ट असलेल्या गावाची माहिती दिली तर सुत्रसंचलन रमेश वाघमारे यांनी केले.
आयोजक माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,डॉ.कालीदास मोरे,गंगाप्रसाद काकडे यांच्यी मार्गदर्शन पर भाषणे झाली व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सभेत सहभागी होण्यासाठी गावागावातुन नागरिक युवक महिला यांना सभेसाठी आणावे असे आवाहन केले,यावेळी माजी पंचायत समिती सदस्य कैलास जाकापुरे,धनेगाव ग्रामपंचायत सदस्य प्रतिनीधी माधव जंगमे,यांच्या भाजपा पक्षा मध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रवेश झाला, या बैठकीस नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.