[ad_1]
Team India Players Experience: टीम इंडिया जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान इंग्लंडचा दौरा करेल. यात दोन्ही टीममध्ये 5 कसोटी सामने खेळले जातील. ही सिरिज 2025-24 आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग असून हे सामने हेडिंग्ले (लीड्स), एजबॅस्टन (बर्मिंगहॅम), लॉर्ड्स (लंडन), ओल्ड ट्रॅफर्ड (मँचेस्टर) आणि ओव्हल (लंडन) येथे खेळवले जाणार आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारताची ही पहिली द्विपक्षीय कसोटी मालिका असेल. दरम्यान टीमने नवीन कसोटी कर्णधाराचीही घोषणा केलीय. कॅप्टन म्हणून नवखा असलेल्या शुभमन गिलच्या प्लेयर्सकडे किती मॅचेसचा अनुभव आहे? सविस्तर जाणून घेऊया.
बीसीसीआयने कसोटी मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीय. या टीममध्ये अनेक अपेक्षित आणि काही आश्चर्यकारक बदल दिसून आलेयत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता कर्णधारपदाची जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आलीय. तर ऋषभ पंतला उपकर्णधार बनवण्यात आलंय. यासोबतच काही खेळाडू टीममध्ये परतलेयत तर काहींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.
नवीन चेहरे आणि पुनरागमन करणारे खेळाडू
बी साई सुदर्शनला पहिल्यांदाच कसोटी संघात संधी मिळालीय. त्याने अलिकडेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि भारत अ टीमठी चमकदार कामगिरी केलीय. तो आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. साई सुदर्शनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्व फॉर्मेटमध्ये खेळणारा खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केलीय. त्याने 2024-25 च्या रणजी ट्रॉफीमध्ये 3 सामन्यांमध्ये 76 च्या सरासरीने 304 धावा केल्या. ज्यात एक द्विशतक, एक शतक आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. तामिळनाडूच्या 23 वर्षीय फलंदाजाने आतापर्यंत 29 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 1,957 धावा केल्यायत, ज्यात 7 शतके आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे.
करुण नायर सात वर्षांनी कसोटी संघात परतलाय. 2016 मध्ये त्रिशतक झळकावून तो चर्चेत आला होता. 2017 पासून भारतासाठी एकही कसोटी सामना न खेळल्याने स्थानिक हंगामात विदर्भासाठी त्याच्या प्रभावी कामगिरीने त्याने निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 9 सामन्यांमध्ये 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये तो चौथ्या क्रमांकावर होता.
अर्शदीप सिंगला टी-20 क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल बक्षीस मिळालंय. त्याने काउंटी क्रिकेटमध्येही आपली प्रतिभा दाखवलीय. त्याला पहिल्यांदाच कसोटी टीममध्येही स्थान देण्यात आलंय. शार्दुल ठाकूर बराच काळ टीमबाहेर होता. पण प्रथम श्रेणी क्रिकेट आणि नंतर आयपीएलमध्ये त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे त्याने संघात स्थान मिळवले आहे.
टीम इंडियामध्ये कोणत्या खेळाडुला किती कसोटी मॅचचा अनुभव?
रवींद्र जडेजा-80
के.एल.राहुल- 58
जसप्रीत बुमराह-45
ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर)- 43
मोहम्मद सिराज- 36
शुबमन गिल (कर्णधार) -35
यशस्वी जैस्वाल- 19
कुलदीप यादव- 13
शार्दूल ठाकूर- 11
वॉशिंग्टन सुंदर- 9
आकाश दीप- 7
करुण नायर-6
ध्रुव जुरेल (विकेटकीपर)- 4
नितीश कुमार रेड्डी- 4
प्रसिध कृष्णा- 3
अभिमन्यू इश्वरन- 0
साई सुदर्शन- 0
अर्शदीप सिंग-0
[ad_2]