Does Vaibhav Suryavanshi met Colonel Sofiya Qureshi photo goes viral know fact check | वैभव सूर्यवंशी आणि कर्नल सोफिया कुरैशीचा Photo Viral, जाणून घ्या नेमकं काय आहे सत्य

0

[ad_1]

Vaibhav Suryavanshi met Sofiya Qureshi Photo Viral: आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये कमी वयात पदार्पण केलेल्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा झाली. आपल्या आक्रमक फलंदाजीने क्रिकेट विश्वात त्याने खळबळ उडवून दिली.  सध्या तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतो.. अलीकडेच त्याचा एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. त्या व्हायरल फोटोमध्ये तो भारतीय लष्कराच्या कर्नल सोफिया कुरैशीसोबत दिसत आहे. मात्र, या फोटोंमागचं सत्य काहीसं वेगळंच आहे. चला जाणून घेऊयात नक्की काय आहे सत्य… 

सोफिया कुरैशीसोबत खरोखर भेट झाली होती का?

व्हायरल फोटोमध्ये वैभव आणि कर्नल सोफिया एकत्र दिसत आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. पण हा फोटो कोणत्याही अधिकृत कार्यक्रमातील नाही. तसेच अशा कोणत्याही भेटीबाबत अधिकृत माहितीही समोर आलेली नाही. त्यामुळे अनेकांनी या फोटोवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

खरा आहे का फोटो?

हा फोटो कदाचित एडिट केलेला किंवा AI मधून बनावटरित्या बनवलेला असल्याचे दिसून येत आहे.  वैभवच्या बाबतीत हे पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधीही वैभवचा एक फोटो अभिनेत्री प्रीती झिंटा सोबत व्हायरल झाला होता, ज्यात दोघं एकमेकांना मिठी मारताना दिसत होते. नंतर  तो फोटो देखील बनावट असल्याचं समोर आलं होतं.

कोण आहेत कर्नल सोफिया कुरैशी? 

कर्नल सोफिया कुरैशी या ऑपरेशन सिंदूरच्या वेळी चर्चेत आल्या. त्या भारतीय लष्करातील एक सन्माननीय अधिकारी आहेत. अलीकडेच भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत झालेल्या तणावादरम्यान, त्यांनी विंग कमांडर व्योमिका सिंगसोबत पाकिस्तानच्या कारवायांचं खंडन जागतिक स्तरावर मांडलं होतं.

फोटोंपेक्षा कामगिरी मोठी

सोशल मीडियावर बनावट फोटो व्हायरल होत असले तरी वैभवची मैदानातील कामगिरीच त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून देत आहे. पदार्पणातच त्याने खुप उत्तम सुरुवात केली असून आता तो आगामी काळातही अशाच प्रकारे चमकत राहील, अशी चाहत्यांना आशा आहे.



[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here