बुलडाणा,(प्रतिनिधी)- जिथे समाजावर अन्याय होईल तिथे सिद्धार्थ खरात पोहचेल असे मत त्यांनी व्यक्त केले.आपल्याला समता मुलक समाज निर्माण करायचा आहे, मी फुले शाहू आंबेडकर विचारांचा पाईक आहे,आणि या विचारासाठी मी सदैव समर्पित राहील अशा शब्दात आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपस्थित समाज बांधवाना आश्वासित केले. यश सिद्धी सैनिक सेवा संघ आयोजित वधूवर मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते . डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन बुलडाणा येथे यश सिद्धी सैनिक सेवा संघ, ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली व रमाईच्या लेकीं समुहाच्या वतीने स्मृतीशेष रंगनाथ डोंगरदिवे (दादा साहेब)यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्ताने बौद्ध वधू वर परिचय मेळावा भरघोस प्रतिसादातून यशस्वी पणे संपन्न झाला, कार्यक्रम चे उदघाटन आमदार सिद्धार्थ खरात, मेहकर विधानसभा मतदार संघ यांच्या हस्ते संपन्न झाले तर कार्यक्रम चे अध्यक्ष कर्णल सुहास जतकर मा, संचालक सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र, तर प्रमुख मार्गदर्शक ॲड.सुमित सरदार माजी जिप सदस्य हे उपस्थित होते.
आमदार खरात पुढे म्हणले की यश आणि यश सिद्धी सैनिक सेवा संघ हे एक समीकरण बनलं आहे. बौद्ध वधू वर परिचय मेळावा सारखे सामाजिक कार्यक्रमाची आज खूप गरज आहे. तसेच यश सिद्धी सैनिक सेवा संघ व संस्थापक अनिल डोंगरदिवे यांच्या कार्य उल्लेखनीय असून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे. काही लोक स्वतः चळवळीला समर्पित होतात असे समाजशील लोकांमुळे चळवळ आज जिवन्त आहे. यश सिद्धी सैनिक सेवा संघ ने महार रेजिमेंटचा स्थापना दिवस साजरा केला, तसा कार्यक्रम मी माझ्या आयुष्यात कधीच बघितला नाही, इतका नियोजन बद्ध, शिस्त बद्ध कार्यक्रम फक्त यश सिद्धी सैनिक सेवा संघ च करू शकतो असे गौरोउध्दगार व्यक्त केले, ते पुढे म्हणाले आजचा कार्यक्रम ही तसाच भरगच्च यशस्वी झाला, मी नेहमीच यश सिद्धी सैनिक सेवा संघा सोबत आहे असं मत ॲड.सुमित सरदारयांनी व्यक्त केले. कर्णल सुहास जतकर यांनी वधू वर परिचय मेळावा किती महत्व आहे याचे अनेक उदाहरण देऊन आपले मत व्यक्त केले.
कार्यक्रम च्या दुसऱ्या सत्रात, वधू, वर यांचे बायोडाटा घेतलेल्या मुला मुलींनी आपला परिचय दिला, अश्या जवळ पास 75 विवाह इच्छुक मुला मुलींनी आपला परिचय दिला. कार्यक्रम चे सूत्र संचलन मुख्य आयोजक अनिल डोंगरदिवे यांनी तर प्रास्ताविक ऋणानुबंध समाज विकास संस्थेचे प्रशांत डोंगरदिवे तर विलास बोर्डे यांनी आभार प्रदर्शन केले.
यशस्वीतेसाठी प्रा.प्रदीप मघाडे, सिद्धार्थ मिसाळ, गुलाब मिसाळ,मधुकर खरे, विजय राऊत,गणेश साळवे,मदन बिबे,भारत जाधव, संजय ससाणे, विशाल घेवंन्दे,विलास जाधव, वामन खरात,कॅप्टन नंदकिशोर ढाकरके, कॅप्टन श्रीराम जाधव,विद्यासागर डोंगरदिवे,कॅप्टन रमेश भुसारी, दिलीप खिल्लारे,राजू पवार, बी जी मगर, समाधान मोरे,मधुकर जाधव,शंकर हिवाळे,बाबुराव साळवे,श्रीकृष्ण तायडे,मधुकर निकाळजे,शेषराव खरात,विलास बोर्डे,अनिल इंगळे, जोगदंड इत्यादीनी परिश्रम घेतले