स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर जयंती भर पावसात कोपरगांवात साजरी…
कोपरगाव प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर म्हणजे राष्ट्रभक्तीने भिनलेले जाज्वल्य विचार आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची मरण यातना भोगलेल्या स्वातंत्र्यवीरांचे जाज्वल्य विचार देशहिताच्या कार्यात नेहमी स्मरण करा रहा. त्यांचे विचार सार्वजनिक जीवनात भिडस्त आणि निडर बनवतात. असे स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
हिंदू महासभेचे अध्यक्ष,थोर क्रांतिकारक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १४२ वी जयंती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर विचारमंच, महाराष्ट्र प्रांत ,धर्मयोध्दा माजी खासदार स्व. भिमराव (नाना) बडदे स्मृती प्रतिष्ठाण, महाराष्ट्र प्रांत, कोपरगांव शाखा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्वातंत्र्यवीर व्यापारी संघटना यांचे वतीने स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर चौक कोपरगांव येथे भर पावसात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी स्वच्छतादूत सुशांत घोडके, प्रसिद्ध अकौंटन्ट नितीन डोंगरे, सुनील गोखले, रामदास खैरे, रामचंद्र बागरेचा, दिलीपराव घोडके, प्रभाकर वाणी, सुनिल वायखिंडे, निलेश साबळे, राजेंद्र कुदळे, सुशांत खैरे, गिरीश हिवाळे, एकनाथ हिवाळे, अनिल काले,राजकुमार हलवाई,एस.डी.देशपांडे, सुरेश कांगुणे, अमोल हलवाई, राजेंद्र कुदळे, नितीन काले,मुकुल आहेर, गोविंदराम चावला,अनिल पारख, इब्राहिम बागवान, सुरेश भोईर, किशोर मांडगे, बापू गोसावी, विशाल होन ,रवि मोकाशे, विजय पगारे , हेमंत सूर्यवंशी, स्वराज खरात, स्वस्तिक शेळके यांचे सह राष्ट्रप्रेमी नागरिक, छोटे व्यापारी उपस्थित होते.