शिरीष जंगम जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित !
सातारा : बंधुत्व प्रतिष्ठानतर्फे बंधुत्व जीवन गौरव पुरस्कार शिरीष बाबुराव जंगम यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष साहित्यिक सुदर्शन इंगळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थापक अनिल वीर,ज्येष्ट नागरिक संघाचे शामराव बनसोडे,दादासाहेब ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
अनिल परब यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व शिरीष जंगम यांचे असल्याचे ठाम मत अनिल वीर यांचे झालेले आहे.कारण,परब यांच्यासारखे अभ्यासु व्यक्तिमत्व असून दिसणे व विचारही तंतोतंत जुळत आहेत.
शिरीष जंगम यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक आणि कोरेगाव तालुका प्रति सरकारचे प्रमुख बाबुराव शंकर जंगम (गुरुजी) होते. वडिलांचा वारसा आणि त्यांच्या आंदोलनातील प्रसंग ऐकल्याने विद्यार्थी युवक चळवळीत सहभागी होतील. अशी स्फूर्तिदायक घटना आहेत.
शिरीष जंगम यांनी सर्वाना मोफत शिक्षण आणि सक्तीने रोजगार मिळावा. यासाठी विविध मोर्चे, आंदोलने, मेळावे यामध्ये सहभाग घेतला होता. काही काळ स्टुडन्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष आणि सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. सातारा, खंडाळा ते फलटण शिक्षण जागृतीसाठी सहकाऱ्यासह सायकल फेरी, एसटी भाडे वाढ विरुद्ध आंदोलन, उरमोडी धरण ग्रस्तांचे आंदोलनात सहभाग, सातारा येथे आयोजित महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी मेळावा यशस्वी केला.शहीद भगतसिंग यांचे कार्य आणि विचारांचा प्रचार प्रसार, प्रतिवर्षी शहीद भगतसिंग प्रतिष्ठान तर्फे शहीद भगतसिंग चौक, बुधवार पेठ येथे होणाऱ्या स्मृतिदिन कार्यक्रमात पुढाकार.
समर्थनगर सातारा येथे शहीद भगतसिंग यांचे नावाचे एकमेव उद्यानाची स्थापना केली आहे.