आभाळा ..
मान्सूनपूर्व हजर तो
दारीउभा पावसाळा
सफाई कामे अपूर्ण
नद्यांना येई फेसाळा
सफाई कामगार त्रस्त
त्यांचा कुणा उमाळा
उपसा गाळाची तुंबई
जिथे तिथे रे पिटाळा
नालेगटारी तुंबलेल्या
राडारोड्याचा इसाळा
त्वरीत करा हो कामे
आला यंत्रणे पिसाळा
कितीकरणार तक्रारी
का येत नाही कंटाळा
गटारी दुर्गधी पसरवी
तोंडाला लावला टाळा
कुठे नेऊनि टाकायचे
तळ्यात ठासले गाळा
चिखलात फुलले तरी
असह्यझालेयं कमळा
पुढारी अधिका-यांची
घेऊ लागतीलं शाळा
खालच्यांचे कानपिळा
असे करु नको बाळा
सामान्य माणूस सोसे
कारभार सर्व गबाळा
खाली अस्वस्थ गटारी
दोष वरल्या आभाळा
इमारत ..
देऊ लागल्या इशारे
धोकादायकइमारती
अधिकारी मद मस्त
खात बसले इमरती
पावसाळा उभा दारी
वादळवारे दावेभिती
भुसभुशीत ती माती
नावाला म्हणा भिंती
कोसळेलं कधी काय
करती धडधड छाती
जबाबदारी भलीबडी
भोके पडलेल्या छती
अंतिम नोटीस देऊन
साहेब मोकळे होती
नगर सेवक झटकले
काहीना आमचेहाती
इवलासा पाऊसजरी
तळे तुडूंब सभोवती
दहा बाय दहा मध्येही
आठ दहाजण मावती
रे कालाय तस्मै नमः
कधीही पडे आहुती
दोषी फक्त रहिवासी
बोलत लागती मागुती
जाऊदे दोनचार बळी
यंदा होअधिकगळती
तोट्यातफायदा शोधा
पक्की घरेतर मिळती
– हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.