जनजागृतीचा अभाव असल्याचे सांगत केली खंत व्यक्त.
उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )
उलवे शहरातील व आजू बाजूच्या ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदार जागृतीची तीव्र गरज भासत आहे. काही भागांमध्ये खऱ्या मतदाराला मतदान करता न आल्याच्या तक्रारी सतत पुढे येत असून, अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाने याबाबत तातडीने हस्तक्षेप करणे आवश्यक झाले आहे.
उलवे शहरात व आजूबाजूच्या ग्रामपंचायत मध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्याची गरज निर्माण झाले आहे.मतदान संदर्भात नागरिकांना योग्य वेळी योग्य माहिती, योग्य मदत मिळत नाही. जनजागृती पाहिजे तशी होत नाही त्यामुळे अनेक नागरिकांना मतदान पासून वंचित राहावे लागल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उलवे शहर अध्यक्ष संतोष काटे यांनी व्यक्त केली आहे.
यासाठी शासनाने त्वरित विविध उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.निवडणूक म्हणजे लोकशाहीचा कणा. मात्र उलवे भागातील काही परिसरात नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत, तर काहींनी मतदान केंद्रांची माहिती न मिळाल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे.