शेतमालाला दीडपट भाव मिळविण्यासाठी युवकांनी पुढे यावे  : कॉ.शिरीष जंगम

0
IMG-20250605-WA0742.jpg

सातारा प्रतिनिधी  : कॉम्रेड काकाजी जाधव   यांनी ३० वर्षांपूर्वी शेतकरी, बेरोजगार आदींसाठी अखेरपर्यंत कार्य केले होते.तेव्हा शेतकरी यांच्या मालाला दीडपट भाव मिळविण्यासाठी त्यांनी जनजागृती केली होती.आता सुद्धा तोच प्रश्न ऐरणीवर असल्याने युवकांनी दीडपट भावासाठी संघटीत लढा दिला पाहिजे.असे आवाहन बंधुत्व जीवनगौरव पुरस्कार विजेते कॉ.शिरीष जंगम यांनी केले.

     

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक, कोरेगाव तालुक्यात प्रति सरकार च्या नेतृत्वाखाली इंग्रजांची दमछाक करनारे आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार, कॉम्रेड काकाजी कदम यांचा ३० वा स्मृतिदिन खेड, ता. कोरेगाव या त्यांच्या गावी अभिवादन मान्यवरांनी केले.तेव्हा शिरीष जंगम मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी उपसरपंच राजेंद्र कदम होते. व्यासपीठावर कॉ.माणिक अवघडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कदम, शिवसेना उपजिल्हाप्रमुख  सादीक बागवान,पालक संघटनेचे तथा काँग्रेसचे श्रीकांत कांबळे,बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,भास्कर कदम,पी.एस.पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

       

  कॉ.शिरीष जंगम म्हणाले,”कॉ.काकाजी यांनी निस्वार्थपणे शेतकरी व अन्यायाविरोधार्थ लढा उभारला होता.विशेषतः किसान सभेतून काम अखेरपर्यंत केले.युवकांना चांगले दिवस येण्यासाठी ऐक्यभाव राखुन त्यांना आधुनिक व सकारात्मक मार्गदर्शन केले पाहिजे.” 

          यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.उल्हास पुराणिक यांनी प्रास्ताविक केले.डॉ.प्रा.आनंद साठे यांनी सूत्रसंचालन केले. अशोक जाधव यांनी आभार मानले.सदरच्या कार्यक्रमास प्रकाश खटावकर, विनायक आफळे,परवेज सय्यद, सलीम आतार,दत्तात्रय राऊत, रामराव बर्गे,श्रीमंत भंडारे,अण्णा कांबळे आदी विविध क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते,महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.याकामी,खेड ग्रामस्थ, शेतकरी युवा मंच,शहिद भगतसिंग स्मृती समिती, राष्ट्र सेवा दल आदी संघटनांनी अथक असे परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here