सातारा प्रतिनिधी : वृक्षारोपण बरोबरच वृक्षसंवर्धन कुरणेश्वर मॉर्निंग ग्रुप करीत असल्याचे गौरवोद्गार पो.निरीक्षक तांबे व मेहत्रे यांनी काढले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील कुरणेश्वर परिसरात कुरणेश्वर मॉर्निंग ग्रुप,आयोध्या ग्रुप व हरित सातारा यांच्यावतीने वृक्षारोपनचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.तेव्हा तांबे-मेहत्रे मार्गदर्शन करीत होते.
कुरणेश्वर ग्रुपचे अध्यक्ष डॉ.सतीश भोसले म्हणाले, “परिसरात पोलीस गस्त असणे गरजेचे आहे.कारण,पर्यावरण संबंधी हानी होईल असे कृत्य होवू नये.तेव्हा सम्बधितांनी कार्यवाही करावी.” यावेळी अनेकांनी मार्गदर्शन केले.नेहमीप्रमाणे अनिल कांबळे यांनी गीत सादर केले.कु.संस्कृती खंडखोडे दहावी परीक्षा पास झाल्याबद्धल तसेच वन्यजीव रक्षकचे सुनील भोईटे व अलीकडील ज्यांचे वाढदिवस झालेले सर्वांबद्धल वृक्षारोपन करण्यात आले.यावेळी आयोध्या ग्रुपचे विजयकुमार काटवटे,सौ. ऍड.शुभांगी काटवटे,अंनिसचे प्रकाश खटावकर,कुरणेश्वर ग्रुपचे कार्याध्यक्ष उमेश खंडझोडे, उपाध्यक्ष अनिल वीर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, पर्यावरणप्रेमी,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनी उपस्थीत होते.