स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षेत रियान शेख प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

0

अहिल्यानगर : – शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा अंतिम वर्ष स्थापत्य अभियांत्रिकीचा निकाल नुकताच लागला. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एजुकेशन तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत नगर येथील शेख रियान नाजीर हा विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला.

आठरे पाटील पब्लीक स्कुल मधून शालेय शिक्षण घेत दहावीत प्रथम श्रेणीत रियान उत्तीर्ण झाला होता आणि त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकीत प्रथम श्रेणीत आज उत्तीर्ण झाला आणि पुढे अभियांत्रिकी पदवी करण्याचा त्याचा मानस आहे.

   

  नगरचे प्रसिद्ध गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर नाजीर शेख यांचे चिरंजीव आहे मिळविलेल्या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, माजी नगरसेवक कुमार वाकळे, महानगरपालिकेचे प्रशासक यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले,ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख, विकी जगताप,आदिल शेख, मनपा शहर अभियंता मनोज पारखे, उपअभियंता श्रीकांत निंबाळकर आदींसह शहरातून विविध स्तरातून रियानवर अभिनंदनाचे वर्षाव होत आहे तसेच पुढील वाटचालीस सर्व शुभेच्छा देत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here