विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवावेत : पो नि अरविंद देशमुख

0

मेडिकल,एलएलबी,दहावी आणि बारावी यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

संगमनेर प्रतिनिधी :-

विद्यार्थ्यांनी नेहमी सकारात्मक विचार ठेवून ऊच्च शिक्षण घेण्यासाठी प्रयत्न करावे,उच्च शिक्षणाची वाट अवघड जरूर असुन अशक्य अजिबात नाही हेच या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिध्द केले आहे तसेच अल्पसंख्यांक समाजाने शिक्षणावर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

ऊर्दू भाषा ही अत्यंत मधुर असून चित्रपटातील अनेक गाणी व डायलॉग हे उर्दूत लिहिले जातात जे नेहमी आठवणीत राहतात व उर्दूत शिक्षण घेऊन सुद्धा उच्चशिक्षित होऊ शकतात हे या यशस्वी विद्यार्थ्यांनी सिद्ध केले असे प्रतिपादन संगमनेर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद देशमुख यांनी केले.

अंजुमने इस्लाम ट्रस्ट तर्फे येथील अँग्लो उर्दू ज्यु.कॉलेज येथे आयोजित उच्चशिक्षित विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी येथील प्रसिद्ध वकील ॲड हैदर बॅग हे होते.

यावेळी मेडिकल,एलएलबी,दहावी आणि बारावी मधील यशस्वी विद्यार्थ्यांना गौरव चिन्ह शाल व बुके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन शेख गनी हाजी यांनी प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक अरविंद देशमुख यांचा शाल व बुके देवुन सत्कार केला. अध्यक्षस्थानी बोलताना एडवोकेट हैदर बेग यांनी न्यायिक प्रक्रियेमधील येणाऱ्या अडचणी व बदलती समाज व्यवस्थेवर त्यांनी विस्तारित भाषण केली.

संस्थेच्या व ऊर्दूत शिक्षण घेऊन सुद्धा मेडिकल मध्ये एम.डी.ही डिग्री यशस्वी होवू शकते हे डॉ.रूही शेख यांनी सिद्ध केले आहे असे प्रतिपादन चीफ ट्रस्टी अब्दुल्ला चौधरी यांनी केले आहे. प्रस्ताविक शमशोद्दीन इनामदार यांनी केले या प्रसंगी ट्रस्टी,शेख नज़ीर ताजमोहमद, शेख एजाज शमशोद्दीन, मुख्याध्यापिका शेख रिज़वाना सलिम, शिक्षकवृंद पालक वर्ग,जे.यु.सी. ऊपाध्यक्ष सय्यद असिफ अली,शेख इरफान,शेख दस्तगीर,रि. प्राचार्य दिलशाद शेख, गफ्फार शेख, जवाहरलाल नेहरू ऊर्दू सेंटरचे अध्यक्ष शेख ईदरीस, इत्यादी मान्यवर उपस्थित होतेसूत्रसंचालन मुन्नवर खलील यांनी केले तर संस्थेचे सचिव पठाण शौकत खान यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here